शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

विद्यापीठात उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी फक्त ८६३ प्राध्यापक रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 6:22 PM

विद्यापीठ अंतर्गत ४ हजार ८५२ प्राध्यापकांपैकी अवघे ८६३ प्राध्यापकच रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देचार जिल्ह्यांतील १६ केंद्रांवर उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू निकाल जाहीर होण्यास विलंबाची शक्यता

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना १५ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. मात्र, मूल्यांकनासाठी प्राध्यापकच येत नसल्यामुळे तब्बल ८ लाख ९ हजार ३०० उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. शनिवारी ४ हजार ८५२ प्राध्यापकांपैकी अवघे ८६३ प्राध्यापकच रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पदवी परीक्षांना सुरुवात होऊन महिना उलटला आहे. बहुतांश अभ्यासक्रमांच्या परीक्षा संपल्या आहेत. यांचे निकाल ३० दिवसांत लावण्याचे आवाहन आहे. उत्तरपत्रिका तपासून गुणांचे एकत्रीकरण करून संगणकात अपलोड कराव्या लागतील. त्यानंतर पुन्हा तपासणी होऊन गुणपत्रिका छपाई केली जाईल. या उत्तरपत्रिकाच तपासण्यात येत नसल्याने पदवीचे निकाल तीन महिन्यांपर्यंत लांबण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. या परीक्षा संपताच अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि विधिच्या परीक्षांना सुरुवात होईल. यामुळे पदवीचे निकाल लांबण्याची चिन्हे आहेत. 

कागदोपत्री प्राध्यापकांची संख्या अधिकविद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये ४ हजार ८५२ प्राध्यापक कार्यरत असल्याची आकडेवारी विद्यापीठ प्रशासनाकडे आहे. यातील सर्वच प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी रुजू होण्यासाठी तीन वेळा पत्रव्यवहार परीक्षा विभागाने केला; मात्र बहुतांश प्राध्यापकांनी रुजू न झाल्याच्या कारणाचा खुलासाही केला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यातील बहुतांश प्राध्यापक फक्त कागदोपत्रीच असल्याची माहितीही समोर आली आहे, तसेच रुजू झालेल्यांमध्ये बहुतांश जण तासिका तत्त्वावरील प्राध्यापक आहेत.

...कायदा काय सांगतोमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४८ पोटकलम ४ अन्वये विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये व संस्थेतील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाºयांना परीक्षेचे कार्य करणे बंधनकारक आहे. यात कसूर केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार परीक्षा विभागाने  ४ हजार ८५२ प्राध्यापकांशी पत्रव्यवहार केला आहे. उत्तरपत्रिका तपासल्याशिवाय निकाल लागणार नाहीत. निकाल वेळेत लावण्यासाठी प्रत्येक प्राध्यापकाचा उत्तरपत्रिका तपासण्यात हातभार लागला पाहिजे. कायद्याने तसे बंधन घातले आहे. त्याचे पालन सर्वांनी करण्याची अपेक्षा आहे. अन्यथा कुलगुरूंच्या सल्ल्यानुसार पुढील पावले उचलली जातील.-डॉ. जयश्री सूर्यवंशी, संचालक, परीक्षा विभाग

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादexamपरीक्षाStudentविद्यार्थीProfessorप्राध्यापक