शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचा कबड्डी संघ चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:34 IST

दापोली येथे सुरू असलेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मुलांचा कबड्डी संघ चॅम्पियन ठरला.

ठळक मुद्देप्रमोद काळेचे वैयक्तिक दुसरे रौप्य : बास्केटबॉल संघानेही जिंकले कास्य

प्रमोद काळेचे वैयक्तिक दुसरे रौप्य : बास्केटबॉल संघानेही जिंकले कास्य
औरंगाबाद : दापोली येथे सुरू असलेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मुलांचा कबड्डी संघ चॅम्पियन ठरला. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कबड्डीपटू मयुरेश शिवथरकर या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरीही ठरला.
त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघानेदेखील भरीव कामगिरी करताना कास्यपदक जिंकले, तर अ‍ॅथलेटिक्समध्येदेखील खेळाडू जबरदस्त कामगिरी करीत असून, काल रौप्यपदक जिंकणाºया प्रमोद काळे याने आजदेखील त्याचे दुसरे पदक जिंकले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कबड्डी संघातील खेळाडूंनी चौफेर खेळ करताना तुल्यबळ मुंबई विद्यापीठाचा ३८ विरुद्ध १६ असा २० गुणांनी धुव्वा उडवताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मयुरेश शिवथरकर याने जबरदस्त चढाया करताना विजयात योगदान दिले. त्याला भूषण कुंभार आणि सुनील दुबिले यांची तोडीची साथ लाभली. सुवर्णपदक जिंकणाºया कबड्डी संघात गणेश जाधव, सुनील दुबिले, तुषार भोईर, मयुरेश शिवथरकर, भूषण कुंभार, ज्ञानेश्वर गुंजाळ, शैलेश डांगे, कुलदीप जाधव, संदीप जाधव व विजय अनपट यांचा समावेश होता. या संघाला प्रशिक्षक डॉ. माणिक राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
अ‍ॅथलेटिक्समध्येही काल गोळाफेकमध्ये रौप्यपदक जिंकणाºया प्रमोद काळे याने आजही जबरदस्त कामगिरीत सातत्य राखताना ४३.४५ मीटर थाळीफेक करताना वैयक्तिक दुसरे रौप्यपदक जिंकले. याआधी अ‍ॅथलेटिक्समध्ये अनिल गुंघासे याने ६४ मीटर १० सेंटिमीटर भालाफेक करताना सुवर्णपदक जिंकले होते, तर स्नेहल हार्दे हिने उंच उडीत रौप्यपदक पटकावले होते. या खेळाडूंना सुरेंद्र मोदी आणि नितीन निरावने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
आज बास्केटबॉलमध्ये औरंगाबादने नांदेडच्या एसआरटी विद्यापीठावर ६३-४७ अशी मात करीत कास्यपदक जिंकले. राष्ट्रीय खेळाडू शुभम पांडे आणि अक्षय खरात यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या संघाला जमीर सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. पदकविजेत्या खेळाडूंचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.