बामु विद्यापीठ वसतिगृह प्रवेशक्षमता दीडपट वाढली

By Admin | Updated: July 5, 2014 01:02 IST2014-07-05T00:53:37+5:302014-07-05T01:02:31+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थिनी वसतिगृहाची प्रवेशक्षमता यावर्षीपासून दीडपट वाढली आहे.

The University of Bamu has increased the penetration of hostels | बामु विद्यापीठ वसतिगृह प्रवेशक्षमता दीडपट वाढली

बामु विद्यापीठ वसतिगृह प्रवेशक्षमता दीडपट वाढली

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थिनी वसतिगृहाची प्रवेशक्षमता यावर्षीपासून दीडपट वाढली आहे. चालू शैक्षणिक वर्षी विद्यापीठात नव्याने बांधण्यात आलेल्या ५०० विद्यार्थी क्षमता असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठवाडा आणि शेजारील जिल्ह्यांतील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यातील बहुतेक विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था नसल्याने ते वसतिगृहात राहत असतात. विद्यापीठातील विविध वसतिगृहांत एक हजार विद्यार्थी राहू शकतील एवढीच क्षमता होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नव्हता. त्यांना विद्यापीठाबाहेर घर भाड्याने घेऊन राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने केलेल्या मागणीनंतर अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र ५०० खोल्यांचे वसतिगृह मंजूर केले. त्यासाठी ४ कोटी ८४ लाख ६८ हजार रुपयांचा निधीही मंजूर केला होता.
२४ जानेवारी रोजी या वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. नुकतेच वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. तेथील प्रत्येक खोलीमध्ये तीन मुलींची व्यवस्था करण्यात आली असून वॉर्डनचे कार्यालय, सीक रूम, कॉम्प्युटर रूम, अपंगांसाठी स्वतंत्र खोली आदी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.

Web Title: The University of Bamu has increased the penetration of hostels