शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात करता येईल बारावीनंतर थेट एम. टेक.

By admin | Updated: July 19, 2014 01:22 IST

औरंगाबाद : शहराची औद्योगिक पार्श्वभूमी बघता संशोधनाच्या माध्यमातून उद्योजक निर्माण करण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतली आहे.

औरंगाबाद : शहराची औद्योगिक पार्श्वभूमी बघता संशोधनाच्या माध्यमातून उद्योजक निर्माण करण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतली आहे. त्याअनुषंगाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांची भेट घेऊन या विद्यापीठातील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (निलिट) या संस्थेत १२ वीनंतर थेट एम.एस्सी. व एम. टेक हा संशोधनात्मक अभ्यासक्रम सुरू करण्याविषयी चर्चा केली. दरम्यान, लवकरच एका तज्ज्ञ समितीमार्फत यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून तो माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयास सादर केला जाईल. साधारणपणे आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न असतील, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सांगितले. या आठवड्यात दिल्ली येथे देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (निलिट) औरंगाबाद, चेन्नई, हैदराबाद व बंगळुरू या चार केंद्रांची बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाच्या ‘आयआयटी’चे संचालकही उपस्थित होते. देशभरातील ‘निलिट’पैकी औरंगाबादेतील संस्थेचे कार्य सर्वोत्कृष्ट असल्याचा अभिप्राय कुलगुरू डॉ. चोपडे यांनी व्यक्त केला. डॉ. चोपडे म्हणाले की, औरंगाबादेतील वाढते औद्योगिकरण व संभाव्य डीएमआयसीचे प्रकल्प बघता येथे दर्जेदार कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज आहे. विद्यापीठामार्फत कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण केली जाऊ शकते. त्यासाठी निलिट या संस्थेत सामायिक प्रवेशपूर्व परीक्षेच्या माध्यमातून बारावीनंतर थेट ५ वर्षांची एम.एस्सी., व त्यानंतर १ वर्षाचे एम. टेक. हा संशोधनात्मक अभ्यासक्रम शिकविला जाईल. ५० टक्के संशोधन व ५० टक्के अध्ययन यांचा समन्वय साधून संशोधक निर्माण केले जातील. त्यासाठी विद्यापीठात आवश्यक त्या सोयी- सुविधा आहेत.