शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ प्रशासनच जबाबदार

By admin | Updated: May 9, 2014 00:01 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाला घरघर लागल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर या वृत्ताची शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाला घरघर लागल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर या वृत्ताची शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली. मराठी भाषेविषयी अस्मिता असणार्‍या आणि विद्यापीठाच्या मराठी विभागावर प्रेम करणार्‍या मंडळींनी विभागाच्या या अवस्थेला विद्यापीठ आणि प्राध्यापकांतील विसंवाद जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाच्या २०१३-१४ या शैक्षणिक वर्षासाठी २७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी ८ विद्यार्थ्यांनीच परीक्षेला हजेरी लावल्याचे समोर आले होते. एवढेच नव्हे तर सहा वर्षांपूर्वी विभागाने सुरू केलेल्या एकवर्षीय पदविका अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत लोकमतने ३ मे रोजी ‘विद्यापीठातील मराठी विभागाला लागली घरघर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तावर शहरात जोरदार चर्चा सुरू झाली. मराठी विभागाच्या या अवस्थेला जबाबदार कोण याविषयी जाणकारांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न सदर प्रतिनिधीने केला. मान्यवरांनी मराठी विभागास विद्यापीठ प्रशासनच जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत म्हणाले की, विद्यापीठ आणि मॅनेजमेंट कौन्सिलने गुणवत्तेचा विचार न करता तालुका आणि जिल्हास्तरावरील विविध कॉलेजला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली. तेथे सक्षम प्राध्यापक, लायब्ररी आहे अथवा नाही याची देखील शहानिशा करण्यात आली नाही. या सेंटरवर प्रवेश घेतला की पदवी मिळते, एवढेच नव्हे तर सेंटरचे अनुदान बंद होणार नाही याची काळजी घेण्यासाठी अपप्रवृत्तींकडे कानाडोळा केला जातो आणि विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जातात. शिवाय एम. ए. मराठी झाल्यानंतर नोकरी मिळण्याची हमी नाही, हेसुद्धा विद्यार्थी गळतीस कारणीभूत आहे. प्रा. ऋषिकेश कांबळे म्हणाले की, एकतर असंख्य महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता दिली. तेथे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये सवलत दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी विद्यापीठाकडे येण्यास उत्सुक नसतात; सत्र पद्धती, मराठी विभागातील प्राध्यापकांचा परस्पर विसंवाद, असूया, विद्यापीठातील शिक्षणाबद्दल पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात असलेले गैरसमजही मराठी विभागाच्या घरघरीस कारणीभूत आहेत. विवेकानंद कॉलेजमधील मराठी विभागप्रमुख डॉ. दिलीप महालिंगे म्हणाले की, आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील दरी आम्ही कमी केली आहे. परिणामी प्राध्यापकांबद्दल त्यांच्या मनात कोणतीही भीती न राहता ते कधीही शिक्षकांशी बिनधास्तपणे संवाद साधून त्यांची समस्या सोडवून घेतात. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता त्यांना शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी विद्यापीठाऐवजी महाविद्यालयास पसंती देतात.