दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून काकाचा हातच मोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 19:09 IST2018-11-12T19:08:27+5:302018-11-12T19:09:27+5:30

या घटनेत काकाचा हात मोडल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Uncle's hand broke as he did not gave the money to drink alcohol | दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून काकाचा हातच मोडला

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून काकाचा हातच मोडला

औरंगाबाद : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून काकास मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात रविवारी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत काकाचा हात मोडल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बनोटी बसस्थानकावरील चहाच्या दुकानावर हरी शिंदे (६५) उभे असताना चुलत पुतण्या भगवान शिंदे याने दारू पिण्यासाठी शंभर रुपये मागितले. यावर काकाने पैसे देण्यास नकार दिल्याचा राग येऊन भगवानने त्यांना धक्काबुक्की करीत काठीने मारहाण केली. मारहाणीत हरी शिंदे यांचा हात तुटला. ग्रामस्थांनी मध्यस्थी करून वाद मिटविल्यावर भगवानचे वडील दामू शिंदे, मुलगा छोटू शिंदे यांनी शिविगाळ करीत आता हात तोडला आणि नंतर सापडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी भगवान शिंदे, दामू शिंदे, छोटू शिंदे यांच्यावर सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख शकील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जी.ए. जागडे, बनोटी दुरक्षेत्राचे ठाणे अंमलदार सुभाष पवार, दीपक पाटील, दिलीप तडवी, कौतीक सपकाळ  आदी करीत आहेत.

Web Title: Uncle's hand broke as he did not gave the money to drink alcohol