शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

महापालिका सभागृहात अभूतपूर्व गदारोळ; प्रथमच करावे लागले पोलिसांना पाचारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 6:50 PM

गदारोळ करणाऱ्या २0 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्दचा ठराव

ठळक मुद्देएमआयएमच्या सदस्यांची उचलबांगडीखासदारांच्या अभिनंदन ठरावाला बगलसंपूर्ण प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादी अलिप्त

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गदारोळ उडाला. इतिहासात पहिल्यांदाच सभागृहात पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि ठिय्या आंदोलन करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकांची उचलबांगडी करून त्यांना सभागृहाबाहेर काढत २० सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव संमत झाला. या सर्व गदारोळाचे कारण होते नवनिर्वाचित खा.इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन ठरावाला सत्ताधारी शिवसेना-भाजपने दिलेली बगल. 

गदारोळामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या आदेशाने व उपमहापौर, सभागृह नेत्यांच्या सूचक, अनुमोदनाने सदस्यत्व निलंबनाचा ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय झत्तला. गुरुवारच्या मनपा सर्वसाधारण सभेत युती आणि एमआयएमचे नगरसेवक आमने-सामने आल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सभागृहात साडेतीन तास ठिय्या देऊन महापौरांविरोधात घोषणा देणाऱ्या ६ ठिय्येकरी नगरसेवकांची पोलिसांनी उचलबांगडी करून त्यांना सभागृहाबाहेर नेले. यामध्ये एमआयएमच्या विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनादेखील पोलिसांनी सभागृहाबाहेर काढले. पालिका सभेच्या कामकाजात पहिल्यांदाच २० नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव पारित करण्यात आला असून, पोलिसांनी सभागृहातून नगरसेवकांची उचलबांगडी करण्याची घटनाही पहिल्यांदाच घडली. 

दोन दिवसांपूर्वी खा. जलील यांना सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात सत्ताधाऱ्यांनी डावलले होते. तेव्हा एमआयएम नगरसेवकांनी महापौर, प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. त्याचे पडसाद गुरुवारच्या सभेत उमटले. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी खा. जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तुम्ही येण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील सर्व खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव घेतल्याचे सांगत बोर्डे यांची मागणी महापौरांनी फेटाळली. भाजप नगरसेवकांनी शहरातील पाणीटंचाईवर चर्चेची मागणी केली. महापौरांचे दुर्लक्ष व अवमानाच्या भावनेतून एमआयएम नगरसेवक अभिनंदन ठरावासाठी आक्रमक झाले, तर भाजप नगरसेवकांनीही पाण्यासाठी आवाज मोठा केला. भाजप आणि एमआयएम, असा संघर्ष होऊन सभेत वादाची ठिणगी पडली. पाण्यासाठी भाजपचे राजू शिंदे, प्रमोद राठोड यांनी राजदंड पळविला. मात्र, महापौरांच्या सूचनेवरून तो पुन्हा जागेवर ठेवला. भाजप नगरसेवकांनी पाण्यासाठी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या दिला, तर एमआयएम नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर अभिनंदन ठरावासाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्र्यंबक तुपे, विकास जैन, राजू वैद्य आदी महापौरांच्या बचावासाठी घोषणायुद्धात उतरले. हताश होऊन महापौरांनी सभेचे कामकाज थांबविले.

त्यानंतर लगेचच सभा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एमआयएम नगरसेवकांनी अभिनंदन ठरावासाठी घोषणेचा आवाज चढविला. त्यामुळे ठिय्या देणाऱ्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करीत त्यांना सभागृहाबाहेर जाण्याचा आदेश महापौरांनी दिल्याने एमआयएमचे सर्व नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. महापौरांनी पुन्हा सभा तहकूब केली. ‘महापौरांचे करायचे काय, महापौर हाय... हाय...’ अशा घोषणा देत एमआयएम नगरसेवकांनी मनपा दणाणून सोडली. प्रत्युत्तरात शिवसेना-भाजप नगरसेवकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘महापौर जिंदाबाद’, अशा घोषणा सुरूच होत्या.

पोलिसांना पहिल्यांदाच सभागृहात पाचारण घोषणायुद्ध थांबत नसल्याने प्रशासनाने सिटीचौक पोलिसांना पाचारण केले. पालिकेच्या सभागृहात येऊन पोलिसांनी एमआयएम नगरसेवकांना सभागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन करण्याची घटना पहिल्यांदाच घडली. लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू आहे, कारवाईचे परिणाम वाईट होतील, असा इशारा विरोधी पक्षनेत्या बोर्डे, नगरसेवकांनी पोलिसांना दिला.४ या पेचामुळे पोलिसांनी प्रशासनाकडून कारवाईसाठी लेखी पत्राची मागणी केली. नगरसचिवांनी कारवाईसाठी पोलिसांना लेखी पत्र दिल्यानंतर पोलीस बळाचा वापर करीत नगरसेवकांची उचलबांगडी करून त्यांना सभागृहाबाहेर काढले. महिला नगरसेविका स्वत: होऊन बाहेर पडल्या. हे सगळे काही पहिल्यांदाच घडले.

महापौरांनी मतदारांचा अवमान केला नूतन खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव न घेता महापौरांनी जातीयवाद करीत खा. जलील यांना मतदान करणाऱ्या मतदारांचा अवमान केला आहे. लोकशाही मार्गाने सभागृहात आंदोलन केले. मात्र, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यात आला. यापुढे महापौरांची दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी महापौरांना दिले, तसेच सभेत काही महत्त्वपूर्ण आर्थिक विषय होते. शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट पद्धतीने सुरू असून, यावर आम्ही सभागृहात जाब विचारणार होतो; परंतु महापौरांनी मनमानी करीत आम्हाला सभागृहाबाहेर काढल्याचा आरोप एमआयएम पक्षाचे गटनेते नासेर सिद्दीकी यांनी केला.

एमआयएमने केले राजकारण एमआयएमने सर्वसाधारण सभेत गदारोळ करून शहराची प्रतिमा मलिन केली. क्षुल्लक कारणाचे एमआयएमने राजकारण केले. देशातील सर्व खासदारांचे अभिनंदन केले. मात्र, एमआयएमने पाणी प्रश्नावर चर्चा सुरू असताना वाद घातला. असंसदीय बोलून सभागृहात गदारोळ करणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा