परभणीमध्ये लोखंडी गेट अंगावर पडून दोन शाळकरी मुले ठार

By Admin | Updated: February 13, 2016 16:08 IST2016-02-13T16:07:32+5:302016-02-13T16:08:15+5:30

परभणीतील मानवत येथे कॉलेजचे लोखंडी गेट अंगावर पडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Two school children are killed in an iron gate in Parbhani | परभणीमध्ये लोखंडी गेट अंगावर पडून दोन शाळकरी मुले ठार

परभणीमध्ये लोखंडी गेट अंगावर पडून दोन शाळकरी मुले ठार

ऑनलाइन लोकमत

परभणी, दि. १३ - परभणीतील मानवत येथे कॉलेजचे लोखंडी गेट अंगावर पडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मानवत येथील के. के. एम महाविद्यालयाचे गेट दोन शाळकरी मुलांच्या अंगावर पडले आणि ते गंभीर जखमी झाले. उपचारांदरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. तन्मय रामकिशन फन्ड (वय ७)आणि गोविंद मुंजाभाऊ फन्ड (वय १०) अशी मृत मुलांची नावे आहेत. 

Web Title: Two school children are killed in an iron gate in Parbhani