शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी प्रकरणातील दोघे लातुरातून जेरबंद

By admin | Updated: July 21, 2016 01:08 IST

जळकोट : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील गणेश नगरात राहणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षका सारीका शाहूराज भोसले याचे घर

जळकोट : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील गणेश नगरात राहणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षका सारीका शाहूराज भोसले याचे घर भरदिवसा फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी दोघांना लातूर येथून अटक केली.याबाबत नळदुर्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळकोट येथील शिक्षिका सारीका शाहूराज भोसले या ११ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता घराला कुलूप लावून शाळेत गेल्या होत्या. याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी भरदिवसा घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम, दागिने असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला .याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्रे फिरविली. या चोरी प्रकरणातील आरोपी जळकोट येथील जयशंकर ढाब्यावर आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले. या आधारे पोलिसांनी तपास करून लातूर येथून विकास दगडू गारगेवाड (वय २४, रा. सिध्देश्वरनगर) याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून शुभम सूर्यकांत चिखलीकर (वय १९, रा. लातूर) यालही अटक करण्यात आली. आणखी दोन आरोपींच्या मागावर नळदुर्ग पोलिस असून, लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती सपोनि रमाकांत पांचाळ यांनी दिली आहे. (वार्ताहर)