एक लाखाची वीज चोरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:50+5:302020-12-17T04:28:50+5:30
औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या आदेशानुसार औरंगाबाद शहर-१ विभागाचे कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी ...

एक लाखाची वीज चोरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या आदेशानुसार औरंगाबाद शहर-१ विभागाचे कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शंकर चिंचाणे, नक्षत्रवाडी शाखेचे सहायक अभियंता योगेश जाधव, प्रधान तंत्रज्ञ संजय शेजवळ यांच्या पथकाने ८ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता राहुलनगरमधील वीजग्राहक किशोर साहेबराव तुपे याच्या मीटरची तपासणी केली. तुपे मूळ मालक असून, हे मीटर सध्या शेख सलमान शेख मुमताज वापरत आहे. तपासणीत मीटरचे सील तुटलेले आढळून आले. महावितरणच्या प्रयोगशाळेत तपासणी केली असता वायरिंगमध्ये फेरफार करून मीटरची गती कमी केल्याचे निष्पन्न झाले.
मीटरचे मूळ मालक तुपे व वापरकर्ता शेख यांनी दोन वर्षांत सुमारे ७१७१ युनिटची वीज चोरी केल्याप्रकरणी त्यास एक लाख एक हजार ९४९ रुपयांचे अनुमानित बिल व ४ हजार रुपये तडजोड शुल्क असा दंड आकारण्यात आला आहे. महावितरणचे सहायक अभियंता योगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर छावणी पोलीस ठाण्यात १२ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.