दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या अंगावर कार घालून निसटला होता दरोडेखोर अमोल खोतकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:07 IST2025-05-28T12:04:35+5:302025-05-28T12:07:35+5:30

Chhatrapati Sambhajinagar Encounter: टोलनाक्याचे बॅरिकेड्स तोडून सुसाट वेगात पळ काढला. त्यानंतरही त्याने सोमवारी लॉजवर येण्याची हिंमत केली.

Two days ago, robber Amol Khotkar had escaped by driving a car at the police station. | दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या अंगावर कार घालून निसटला होता दरोडेखोर अमोल खोतकर

दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या अंगावर कार घालून निसटला होता दरोडेखोर अमोल खोतकर

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांसाेबत उडालेल्या चकमकीत एन्काउंटर झालेल्या अमोल बाबूराव खोतकर (३४, रा. पडेगाव) हा दोन दिवसांपूर्वीच शहरात आला होता. त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या पोलिसांनी त्याला दौलताबाद परिसरातील समृद्धीवर पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकावर कार चढवून तो हूल देऊन पसार होण्यात यशस्वी झाला होता.

रविवारी पाच दरोडेखोरांना पकडल्यानंतर पोलिस सातत्याने अमाेलच्या मागावर होते. त्याच रात्री तो कारने समृद्धी मार्गे शहरात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. वरिष्ठांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक संदीप सोळुंके पथकासह रवाना झाले. दौलताबादजवळील टोलनाक्याजवळ त्यांनी त्यासाठी सापळादेखील रचला. मात्र, त्याने त्यांच्या अंगावर कार घालून पसार झाला. यात त्याने टोलनाक्याचे बॅरिकेड्स तोडून सुसाट वेगात पळ काढला. त्यानंतरही त्याने सोमवारी लॉजवर येण्याची हिंमत केली.

दुपारी ४ वाजता येऊन गेला
स्थानिकांच्या माहितीनुसार, अमोल दुपारी ४ वाजतादेखील लॉजवर पोहोचला होता. बराच वेळ तो पार्किंगमध्ये कारजवळ उभा होता. तेव्हा त्याच्या चालकाच्या सीटवर दुसऱ्या व्यक्तीला पाहिल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Web Title: Two days ago, robber Amol Khotkar had escaped by driving a car at the police station.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.