शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाखांची शहागड येथे घरफोडी

By admin | Updated: June 13, 2015 23:48 IST

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील शहागड येथे १२ जून रोजी मध्यरात्री एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला.

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील शहागड येथे १२ जून रोजी मध्यरात्री एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली असून या भागात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. कादर उस्मान कुरैशी यांच्या घराचे कुलूप तोडून तीन चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घरात प्रवेश केला. कादर उस्मान यांच्या पत्नी साहेरा बेगम या झोपेत असतानाच त्यांना चोरट्यांनी काठीने मारहाण केली. कपाटातील रोख ३० हजार रुपये व २ लाख रुपये किंमतीचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेची माहिती कळताच गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, उपनिरीक्षक सोमनाथ शिंदे घटनास्थळी हजर झाले. तात्काळ परिसरात गेवराई, अंबड, पैठण येथे माहिती देऊन पोलिसांनी नाकाबंदी केली. परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. चोरट्यांच्या हल्ल्यात साहेरा बेगम जखमी झाल्या आहेत. या चोरीच्या तपासासाठी एक पथक पाठविण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी दिली. या घटनेचा गुन्हा गोंदी पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यासंदर्भात पोलिसांनी गस्त वाढवावी, जेणेकरून चोरीच्या घटना कमी होतील, असेही ग्रामस्थांनी सांगितले. (वार्ताहर)