दोन रोडरोमियोंना ठोठावला बाराशेचा दंड

By Admin | Updated: December 22, 2014 23:32 IST2014-12-22T23:32:22+5:302014-12-22T23:32:22+5:30

बीड : महाविद्यालयातून घरी जाताना मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना चिडीमार पथकाने शनिवारी ताब्यात घेतले होते.

Twelve punishments were punished by two roadmen | दोन रोडरोमियोंना ठोठावला बाराशेचा दंड

दोन रोडरोमियोंना ठोठावला बाराशेचा दंड


बीड : महाविद्यालयातून घरी जाताना मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना चिडीमार पथकाने शनिवारी ताब्यात घेतले होते. सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना प्रत्येकी १२०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
प्रमोद सुधीर वाघमारे (रा. धानोरा रोड) व ज्ञानोबा रामराव वैकुंठे या दोघांना शनिवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरात महाविद्यालयातून घरी जाणाऱ्या विद्यार्थिनींची छेड काढताना सापळा रचून पकडले होते.
मागील अनेक दिवसांपासून हे दोघेजण मुलींची छेड काढत होते. या मुलांचा त्रास सहन न झाल्याने सदरील मुलींनी चिडीमार पथकाकडे तक्रार केली. अनेक दिवस पाळतीवर असलेल्या चिडीमार पथकाने शनिवारी त्यांना ताब्यात घेतले. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी बाराशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
ही कारवाई सहायक फौजदार कांता सोनवणे, मीरा रेडेकर, सुभाष महाडिक, महादेव कोकनार, सुशेन पवार यांनी केली. मागील आठवडाभरापासून कारवाईला वेग देण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Twelve punishments were punished by two roadmen