शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

मिटमिटा दंगल प्रकरण : दिड हजार नागरिकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, दंगलीचे गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 19:16 IST

आप्पावाडी येथील एका जागेवर शहरातील कचरा नेऊन टाकण्यासाठी पोलीस बंदोबस्तात जाणार्‍या ट्रक अडवून मिटमिटा येथील हजारो नागरीकांनी बुधवारी जोरदार दगडफेक आणि जाळापोळ केली होती.

औरंगाबाद: मिटमिटा आणि पडेगाव येथे बुधवारी दुपारी झालेल्या दगडफेक आणि वाहनांच्या जाळपोळप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात दिड हजार नागरीकांवर पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगल करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे यासह विविध कलमांखाली गुन्हे नोंदविले. याप्रकरणी छावणी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत २८ जणांना अटक केली.

याविषयी अधिक माहिती देताना छावणी पोलिसांनी सांगितले की, आप्पावाडी येथील एका जागेवर शहरातील कचरा नेऊन टाकण्यासाठी पोलीस बंदोबस्तात जाणार्‍या ट्रक अडवून मिटमिटा येथील हजारो नागरीकांनी बुधवारी जोरदार दगडफेक आणि जाळापोळ केली होती. या घटनेत पोलीस अधिकारी कर्मचारी गंभीर जखमी झाले. जमावाने केलेल्या दगडफेकीत मनपाच्या दोन ट्रक जाळण्यात आल्या आणि सरकारी आणि खाजगी वाहनांची तोडफोड जमावान केली होती. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगविले आणि नंतर पोलीस बंदोबस्तात कचर्‍यांच्या गाड्या आप्पावाडी येथे नेल्या.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन मिरधे यांच्या तक्रारीवरून सुमारे हजार ते दिड हजार नागरीकांवर पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दंगल करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमानुसार गुन्हे नोंदविले. या गुन्ह्यात पोलिसांनी २४ जणांना ताब्यात रात्री अटक केली.  पडेगाव येथील मच्छिंद्रनाथ मंदीरासमोर बुधवारी सायंकाळी महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार प्रदीप जैस्वाल आणि मनपाचे अधिकारी हे नागरीकांना समजावून सांगत असताना पुन्हा तेथे जमाव आणि पोलिसांत राडा झाला. यावेळी जमावाने पुन्हा एक वाहन पेटवून दिले होते.

या प्रकरणी मनपाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला.सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल करणे, मालमत्तेचे नुकसान करणे,जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी कलमानुसार सुमारे १०० ते १५०नागरीकांवर हा गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी चार जणांना अटक केली.