शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या कर्मचाऱ्यांकडून ‘लालपरी’ वर उपचार

By admin | Updated: May 20, 2015 00:20 IST

बीड : यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या ४० टक्के जागा रिक्त असल्याने लालपरीवर उपचार (दुरूस्ती) करण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत.

बीड : यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या ४० टक्के जागा रिक्त असल्याने लालपरीवर उपचार (दुरूस्ती) करण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची लालपरी (बस) नेहमीच आजारी पडताना दिसून येते.राज्य परिवहन महामंडळाच्या बस रात्रंदिवस प्रवाशांच्या सेवेसाठी धावत असते. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी ती कार्यरत असते. मात्र मागील काही दिवसांपासून महामंडळाच्या सेवेमध्ये कमतरता दिसून येत असून, सुरक्षितता धोक्यात आल्याचे दिसते.बीड विभागीय कार्यालयांतर्गत जिल्ह्यात ५०० बसगाड्या धावतात. त्यांच्या दुरूस्तीसाठी मात्र अपुरे कर्मचारी आहेत. यांत्रिक विभागातील ४० टक्के जागा आजही रिक्त असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. अनेक वेळा बसगाड्या दुरूस्त करण्यास वेळ लागत असून, दुरूस्ती व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येते.नियम काय सांगतो ?बस आगारात आल्यानंतर तिच्या दुरूस्तीसाठी एक कर्मचारी नेमलेला असतो. एक नियत (फेरी) एक कर्मचारी या प्रमाणे यांत्रिक विभागाचे नियोजन असते. मात्र, बस जादा अन् कर्मचारी अपुरे अशी परिस्थिती असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांना जादा वेळ काम करून आलेल्या बसगाड्यांची दुरूस्ती करावी लागत आहे.आगारांमध्येही अपुरी संख्याजिल्ह्यातील आठ आगारांमध्ये यांत्रिक कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे. बीड आगारात केवळ ६० कर्मचारी कार्यरत असून ८८ बसगाड्यांची दुरूस्ती आहे. इतर आगारांचीही हीच परिस्थिती असून याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. जागा भरण्याची मागणी होत आहे.बसगाड्याही अपुऱ्याचसध्या जिल्ह्यात धावत असलेल्या बसगाड्यांची संख्या प्रवाशांची संख्या पाहता खूपच कमी आहे. जिल्ह्यात सध्या ५०० बसगाड्या धावत असून आणखी ४०० गाड्यांची आवश्यकता असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.याबाबत यांत्रिक अभियंता के. एस. लांडगे म्हणाले, विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे हे मान्य आहे. परंतु आमचे योग्य नियोजन आहे. आगारातील रिक्त जागांबाबत विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना विचारावे. (प्रतिनिधी)