छत्रपती संभाजीनगरहून मुंबईचा रेल्वे प्रवास सात रुपये, तर दिल्लीचा २४ रुपयांपर्यंत महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:25 IST2025-07-01T14:17:18+5:302025-07-01T14:25:02+5:30

आजपासून नवे दर : प्रतिकिमी अर्धा ते दोन पैसे वाढ

Train fair increased, Chhatrapati Sambhajinagar to Mumbai by train will cost Rs 7, Delhi by Rs 24 | छत्रपती संभाजीनगरहून मुंबईचा रेल्वे प्रवास सात रुपये, तर दिल्लीचा २४ रुपयांपर्यंत महागणार

छत्रपती संभाजीनगरहून मुंबईचा रेल्वे प्रवास सात रुपये, तर दिल्लीचा २४ रुपयांपर्यंत महागणार

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे मंत्रालयाने १ जुलैपासून नवीन भाडेदर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात विविध रेल्वेंच्या प्रवास भाड्यात प्रतिकिमी अर्धा ते एक पैसे वाढ होणार आहे. साधारण श्रेणीच्या रेल्वेला ५०० किमीपर्यंत भाडेवाढ नाही. शहरातून एक्स्प्रेसच्या एसी क्लासेसमधून मुंबईचा प्रवास सुमारे सात रुपये, तर दिल्लीचा प्रवास जवळपास २४ रुपयांनी महागणार आहे.

छत्रपती संभाजीनगर रोज २५ रेल्वेंची ये-जा होते. सुधारित भाडे १ जुलै रोजी किंवा त्यानंतर बुक केलेल्या तिकिटांना लागू असेल. या तारखेपूर्वी जारी केलेली तिकिटे चालतील. वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशालाही कात्री बसणार आहे. या रेल्वेचा प्रवास प्रतिकिमी २ पैशांनी महागणार आहे.

भाडेवाढ, मग सुविधाही द्या
भाडेवाढ केली जात आहे. ही भाडेवाढ करताना प्रवाशांच्या सुविधांमध्येही वाढ करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. मराठवाड्यातून नव्या रेल्वे सोडाव्यात.
अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती

सामान्य नॉन एसी क्लास-उपनगरीय नसलेल्या रेल्वे
- द्वितीय श्रेणी : प्रतिकिलोमीटर अर्धा पैसे वाढ
- ५०० किमीपर्यंत वाढ नाही.
- ५०१ ते १५०० किमी अंतरासाठी पाच रुपयांनी वाढ.
- १५०१ ते २५०० किमी अंतरासाठी १० रुपयांनी वाढ.
- २५०१ ते ३००० किमी अंतरासाठी १५ रुपयांनी वाढ
- स्लीपर श्रेणी : प्रतिकिलोमीटर ०.५ पैशांनी वाढ.
- प्रथम श्रेणी : प्रतिकिलोमीटर ०.५ पैशांनी वाढ.

मेल/एक्स्प्रेस रेल्वेंसाठी - नॉन-एसी :
- द्वितीय श्रेणी : प्रतिकिलोमीटर १ पैशांनी वाढ.
- स्लीपर श्रेणी : प्रतिकिलोमीटर १ पैशांनी वाढ.
- प्रथम श्रेणी : प्रतिकिलोमीटर १ पैशांनी वाढ.

मेल/एक्स्प्रेस-एसी क्लासेस
एसी चेअर कार, एसी ३-टायर/३-इकॉनॉमी, एसी २-टायर, आणि एसी फर्स्ट/एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी प्रतिकिलोमीटर दोन पैशांनी वाढ होतेय.

कोणती शहरे किती किमीवर आणि किती सरासरी भाडेवाढ?
शहर : किमी - मेल/एक्स्प्रेस रेल्वेंसाठी नॉन-एसी (प्रतिकिलोमीटर १ पैशांनी वाढ) - मेल/एक्स्प्रेस-एसी क्लासेस (प्रतिकिलोमीटर दोन पैशांनी वाढ)
- मुंबई : ३४७ किमी - ३.४७ रु.- ६.९४ रु.
- हैदराबाद : ५६१ किमी - ५.६१ रु.- ११.२२ रु.
- दिल्ली : १,२०४ किमी -१२.०४ रु.- ४.०८ रु.
- अमृतसर : १,६३५ किमी - १६.३५ रु.- ३२.७० रु.
- भोपाळ : ६७२ किमी -६.७२ रु. - १३.४४ रु.
- विशाखापट्टणम : १,१८९ किमी -११.८९ रु.- २३.७८ रु.

Web Title: Train fair increased, Chhatrapati Sambhajinagar to Mumbai by train will cost Rs 7, Delhi by Rs 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.