सिल्लोडमध्ये भीषण अपघात: पिकअपने स्कुटीला १०० फूट फरपटत नेले, डॉक्टरांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 19:48 IST2026-03-17T19:47:33+5:302026-03-17T19:48:37+5:30

सिल्लोडमध्ये पिकअपचा धुमाकूळ! डोंगरगाव फाट्यावर चिरडल्याने डॉक्टरांचा मृत्यू; परिसरात शोककळा

Tragic Accident in Sillod! Bolero Pickup Drags Scooter for 100 Feet, Doctor Dies on the Spot | सिल्लोडमध्ये भीषण अपघात: पिकअपने स्कुटीला १०० फूट फरपटत नेले, डॉक्टरांचा जागीच मृत्यू

सिल्लोडमध्ये भीषण अपघात: पिकअपने स्कुटीला १०० फूट फरपटत नेले, डॉक्टरांचा जागीच मृत्यू

सिल्लोड: सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाट्यावर मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात पालोद येथील डॉक्टर जागीच ठार झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअपने त्यांच्या स्कुटीला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की पिकअपने स्कुटीला सुमारे १०० फूट फरपटत नेले.

नेमकी घटना काय?
डॉ. विश्वास शेषराव पालोदकर (४८, रा. पालोद) हे दुपारी आपल्या स्कुटीवरून (MH 20 FE 3284) काही कामानिमित्त सिल्लोडला जात होते. डोंगरगाव फाट्याजवळ आले असता, सिल्लोडकडून डोंगरगावकडे वेगाने जाणाऱ्या बोलेरो पिकअपने (MH 48 BM 2956) त्यांना चिरडले. या भीषण अपघातात डॉ. पालोदकर यांचा जागीच मृत्यू झाला.

चालक पोलिसांत हजर
अपघातानंतर जमावाच्या भीतीने चालक पिकअप सोडून पसार झाला होता, मात्र सायंकाळी ६ वाजता तो स्वतःहून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवला. रात्री उशिरापर्यंत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. डॉ. पालोदकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री १० वाजता पालोद येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title : सिल्लोड में भीषण दुर्घटना: पिकअप ने स्कूटर को घसीटा, डॉक्टर की मौके पर मौत

Web Summary : सिल्लोड में एक दुखद दुर्घटना में डॉ. विश्वास पालोदकर की जान चली गई। डोंगरगांव फाटा के पास तेज रफ्तार पिकअप ट्रक ने उनके स्कूटर को टक्कर मार दी, जिससे उन्हें लगभग 100 फीट तक घसीटा गया। चालक ने बाद में पुलिस के सामने आत्मसमर्पण कर दिया। दुर्घटना मंगलवार दोपहर को हुई। डॉक्टर के परिवार में पत्नी, बेटा और बेटी हैं।

Web Title : Sillod Accident: Pickup Drags Scooter, Doctor Dies Instantly

Web Summary : A tragic accident in Sillod claimed the life of Dr. Vishwas Palodkar. His scooter was struck by a speeding pickup truck near Dongargaon Phata, dragging him approximately 100 feet. The driver surrendered to police later. The accident occurred Tuesday afternoon. The doctor is survived by his wife, son, and daughter.