शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचा खेळखंडोबा !

By admin | Updated: September 1, 2014 01:08 IST

रमेश शिंदे ,औसा औसा हे तालुक्याचे, मोठी बाजारपेठ, ऐतिहासिक ठिकाण व शैक्षणिक केंद्र असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी असते़ बसस्थानक ते अ‍ॅप्रोच रोड चौकादरम्यानच्या रस्त्यावर

रमेश शिंदे ,औसाऔसा हे तालुक्याचे, मोठी बाजारपेठ, ऐतिहासिक ठिकाण व शैक्षणिक केंद्र असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी असते़ बसस्थानक ते अ‍ॅप्रोच रोड चौकादरम्यानच्या रस्त्यावर अवैध वाहतूक करणारी वाहने तसेच अ‍ॅटोचालकांची मनमानी सुरु असल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे़ त्यामुळे पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ औसा शहरात किल्ला मैदान ते हनुमान मंदिर तसेच बसस्थानक ते अ‍ॅप्रोच रोड चौक हे दोन मुख्य रस्ते आहेत़ किल्ला मैदान ते हनुमान चौक या रस्त्याचे तीन टप्प्यात रूंदीकरण होणार आहे़ गांधी चौक ते जामा मशीद हा पहिला टप्पा तर गांधी चौक ते मोर गल्ली कॉर्नर या दोन टप्प्याचे काम पूर्ण झाल्यामुळे हा रस्ता रुंद झाला आहे़ जामा मशीद ते हनुमान मंदिर या तिसऱ्या टप्प्याचे काम रखडले आहे़ या रस्त्यावर अनेक दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे़ दुकानासमोर वाहने उभी राहतात़ मोठे वाहन आले की, वाहतुकीची कोंडी होत़ आता या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे़ वाहनधारकांसमोर पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ सकाळी शाळा भरताना आणि दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना या वाहतुकीच्या कोंडींचा सामना करावा लागत आहे़बसस्थानक ते अ‍ॅप्रोच रोड कॉर्नर हा शहरातील दुसरा मुख्य रस्ता आहे़ या रस्त्यावर अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालय आहे़ विविध बँकांच्या शाखा आहेत़ त्यामुळे रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते़ या रस्त्याचे अंतर दीड ते दोन कि़मी़ आहे़ या रस्त्यावर जवळपास ८० ते १०० आॅटोचालक आपली वाहने चालवितात़ लातूरहून निलंगा, उमरगा, सोलापूरकडे जाणाऱ्या काही बसेस बसस्थानकात येत नाहीत़ त्यामुळे गावात येण्यासाठी प्रवाशांना आॅटोचा आधार घ्यावा लागतो़ अ‍ॅप्रोच रोड चौकात बस थांबली की, किमान पाच ते दहा आॅटो बसच्या दरवाज्याजवळ येऊन थांबतात़ त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे़ तसेच बसस्थानकाच्या प्रवेश द्वाराजवळ बिंदासपणे वाहने उभी करण्यात येतात़ शहरातील निम्यापेक्षा जास्त आॅटो विनापरवाना आहेत़ विशेष म्हणजे काही आॅटोचालक हे अल्पवयीन आहेत़ रस्त्यात एखाद्या प्रवाशाने हात केला की, मागील वाहनाचा विचार न करता हे आॅटोचालक चक्क रस्त्यातच आॅटो उभा करतात़ त्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडत आहेत़ त्याचबरोबर ग्रामीण रूग्णालयासमोरही अवैैध वाहतूक करणारी वाहने उभी असतात़ त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे़ परिणामी पादचाऱ्यांना चालणेही अवघड होत आहे़ संबंधितांनी याकडे लक्ष देऊन वाहतुकीची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़