शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यास मारहाण

By admin | Updated: September 11, 2014 01:06 IST

उस्मानाबाद : वाहन चालविण्याचा परवाना विचारणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उस्मानाबाद : वाहन चालविण्याचा परवाना विचारणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे पोलिसांनी त्यास पकडून वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणल्यानंतर टेबलाच्या काचावर, भिंतीवर डोके आपटून स्वत: जखमी होत पोलिसांना अडकाविण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उस्मानाबाद शहरात घडला़पोलिसांनी सांगितले की, वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी सचिन खंडेराव व इतर कर्मचारी नेहमीप्रमाणे मंगळवारी सायंकाळी शिवाजी चौकात वाहनांची तपासणी करीत होते़ त्यावेळी आलेल्या अभिषेक राजाभाऊ माने (रा़तुळजापूर) यास खंडेराव यांनी वाहन परवाण्याची विचारणा केली़ त्यावेळी माने याने अरेरावीची भाषा करीत पोलिस कर्मचाऱ्याच्या गचांडीस पकडून मारहाण केली़ या प्रकारानंतर माने यास वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणले़ त्यावेळी माने याने ‘तुम्ही मला ओळखत नाही, मी जीव देवून तुम्हाला अडकाविन’ अशी धमकी देत टेबलावरील काचावर, भिंतीवर डोके आदळून घेतले़ या प्रकरणी पोकॉ सचिन खंडेराव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, स्वत:चे डोके भिंतीवर, टेबलावर आदळून घेणाऱ्या माने यास जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र, त्यास पुढील उपचारासाठी सोलापूर येथील जिल्हा रूग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले़ या घटनेचा अधिक तपास सपोनि महानभाव हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)