शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा

By admin | Updated: July 23, 2014 00:30 IST

बीड: शहरातील अति रहदारीच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी पार्किंग करत असल्याने वाहनकोंडी होत आहे.

बीड: शहरातील अति रहदारीच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी पार्किंग करत असल्याने वाहनकोंडी होत आहे. यामध्ये सुभाष मार्गावर मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्यावरच दुचाकी लावत असल्याने वाहनकोंडी होत असून रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.अति रहदारीच्या मार्गावर तरी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील वाहतुकीचे तीन तेरा झाले आहेत, असा आरोप शहरातील नागरिकांनी केला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात बहुतांश शाळा व महाविद्यालय आहेत. त्यातच विविध वस्तूंची दुकाने देखील शहरातील सुभाष मार्गावर आहेत. याचाच परिणाम भाजी मंडई व सुभाष रोड या भागात मोठ्या प्रमाणात रहदारी असते. परंतु खरेदीसाठी आलेल्यांनी वाहने पार्किंग करताना रस्त्याच्या बाजूला अंतर ठेवून करण्याचे ना संबंधित दुकानदार सांगतो, ना वाहतूक पोलिस सांगतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. या कोंडीमुळे अपघात देखील होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक सुखवसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)भाजी मंडईत विद्यार्थी, पालकांची कोंडीशहरातील भाजी मंडई भागात रस्त्याच्या दुतर्फा फळगाडे, भाजी विक्रेते बसलेले असल्याने अरूंद रस्त्यावरूनच दुचाकी व तीन चाकी वाहने ये-जा करतात. मात्र अनेकवेळी चार चाकी वाहने भाजी मंडईतून जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास शाळकरी विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थ्यांना घ्यायला आलेल्या पालकांना देखील सहन करावा लागत आहे. याबाबत शहर वाहतूक विभागाचे प्रमुख एम.ए. सय्यद यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, शहरातील सुभाष रोडवरील दुकानदारांना नोटिसा देऊन दुकानासमोरील पार्किंग हटविण्याचे सांगितले आहे. तसेच सुभाष रोड, भाजी मंडई भागात पार्किंग व्यवस्था करावी, याबाबत बीड न.प.ला अनेकवेळा पत्र दिलेले आहे, असे त्यांनी सांगितले.