शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सराफा व्यापाऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: March 18, 2016 00:07 IST

परभणी : जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यांनी गुरुवारी आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

परभणी : जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यांनी गुरुवारी आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून सराफा व सुवर्णकार व्यावसायिकांवर लादलेला अबकारी कर रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.अबकारी कर हा व्यापाऱ्यांसाठी जाचक असून तो रद्द करावा, या मागणीसाठी देशभरातील सराफा व्यापाऱ्यांनी बंदचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात परभणी जिल्ह्यातील व्यापारी देखील सहभागी झाले असून १ मार्चपासून संपूर्ण सराफा बाजारपेठ बंद आहे. या आंदोलनांतर्गत परभणी जिल्हा सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. येथील शनिवार बाजारातून दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा मोर्चा निघाला. जिल्हाभरातील व्यापारी शनिवार बाजार येथे एकत्र झाले. शनिवार बाजारातून नानलपेठ, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, विसावा कॉर्नरमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोर्चा दरम्यान आंदोलकांनी केंद्राच्या धोरणाचा निषेध नोंदविला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. असोसिएशनचे अध्यक्ष सचिन अंबिलवादे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांच्यासह इतरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.