शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

‘टूल टेक’ प्रदर्शन मार्च महिन्यात

By admin | Updated: January 11, 2016 00:07 IST

औरंगाबाद : मराठवाडा ‘टूल टेक एक्सपो’ हे प्रदर्शन येत्या ३ व ४ मार्च रोजी भरविण्यात येणार आहे. वाळूज येथील मराठवाडा आॅटो क्लस्टरमध्ये होणारे हे


औरंगाबाद : मराठवाडा ‘टूल टेक एक्सपो’ हे प्रदर्शन येत्या ३ व ४ मार्च रोजी भरविण्यात येणार आहे. वाळूज येथील मराठवाडा आॅटो क्लस्टरमध्ये होणारे हे प्रदर्शन उद्योजकांबरोबरच विद्यार्थी, कुशल कामगार व अभियंत्यांसाठी पर्वणीच ठरेल, असा विश्वास आयोजकांनी रविवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए), मराठवाडा आॅटो क्लस्टर आणि ‘आयसा’ यांच्या वतीने हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. मराठवाड्यातील उद्योगांशी पूरक असणारे हे प्रदर्शन मेटल कटिंग टूल्स, टूलिंग सिस्टीम, टूल डिझाईन सॉफ्टवेअर आणि मेट्रॉलॉजी उत्पादनांवर केंद्रित असेल. या क्षेत्रात अलीकडे झालेले बदल व अद्ययावत प्रगती याविषयी मराठवाड्यातील उद्योगांना माहिती व्हावी, संबंधित उद्योगांना आपल्या उत्पादनांत सुधारणा करता यावी, या हेतूने प्रदर्शन भरविले जाणार असल्याचे ‘सीएमआयए’चे अध्यक्ष आशिष गर्दे यांनी सांगितले.
‘टूल टेक’ क्षेत्रातील प्रदर्शने मुंबई, बंगळूर, दिल्लीसारख्या शहरात भरविली जातात. उद्योग समूहातील उच्च पदस्थांनाच अशा प्रदर्शनांना भेटी देण्याची संधी मिळते. अभियंते, कुशल कामगार, लघु उद्योजक, विद्यार्थी यासारखा वर्ग त्यापासून वंचित राहतो. या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार असल्याचे भरत गंगाखेडकर यांनी सांगितले. विवेक भोसले, लोणीकर, अनिल कोरडे, समीर कानडखेडकर यावेळी उपस्थित होते.