शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ

By admin | Updated: June 22, 2014 00:04 IST

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात सध्या पोलीसांचा वेश धारण करून बहुरूपी घरोघरी फिरत आहेत.

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात सध्या पोलीसांचा वेश धारण करून बहुरूपी घरोघरी फिरत आहेत. चौकाचौकात लोकांकडे जाऊन त्यांची करमणूक करून अर्थार्जनही करीत आहेत. बहुरूपींचा पिढ्या न पिढ्याचा हा व्यवसाय असला तरी आता समाजातून त्यांना म्हणावे तसे अर्थार्जन होत नसल्याने अशा समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.बहुरूपी समाजाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळख आहे. बहुरूपी मनोरंजनासह कधी-कधी खबऱ्या म्हणूनही काम करतात. विशिष्ट कला असलेल्या बहुरूपींना समाजात मान असतो. बहुरूपी समाजाचेही कोणत्या गावात कोणी जावे हे ठरलेले असते, असे कोळगाव येथे आलेले बहुरूपी सुभाष शिंदे यांनी सांगितले. सुभाष शिंदे हे वयाच्या दहाव्या वर्षीपासून बहुरूपी म्हणून गावोगाव जातात. वर्षानुवर्षे ते ज्या गावात जातात तेथील नागरिकांशी त्यांचे दोन ते तीन पिढ्यांपासूनचे संबंध आले असल्याचेही ते सांगतात. अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून लहानांपर्यंत त्यांची ओळख असते. तसेच कोणाच्या मुली कोठे दिल्या. ठराविक नागरिकांची सासरवाडी कोठे आहे, काहींच्या बहिनी कोठे दिलेल्या आहेत आदींबाबत माहितीही बहुरूपी ठेवत असल्याचे शिंदे म्हणाले.गावातील सरपंच, पोलीस पाटील यासह प्रमुख विक्रेते, गावातील ज्येष्ठ नागरिक आदी सर्वांचीच माहिती ठेवावी लागत असल्याचे घोडेगाव तालुका नेवासा येथील बहुरूपी बाबाजी शेंगर यांनी सांगितले.ते म्हणाले की, आम्हाला असंख्य दु:ख असली तरी आम्ही ज्यांच्याकडे जातो त्यांना आम्हाला हसवावेच लागते. नकला, विशिष्ट लयीत बोलून, कोट्या करून लोकांचे मनोरंजन करावे लागते. यातून अर्थार्जनही होते. अनेकदा उन, वारा, पाऊस यांची तमा न करता बहुरूपी गावालगत वास्तव्यास असतात. अशावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र काही ठिकाणी आजही सन्मानाची वागणूक मिळते तसेच चहा, नाष्टा, जेवण आदींची विचारपूस मोठ्या आस्थेने करीत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. बहुरूपी पोलिसांसारखे वेश करीत असल्याने अनेकदा अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणतात तर लहान मुलांची करमणूक होत असल्याचे बाबाजी शेंगर यांनी सांगितले. (वार्ताहर)या समाजासमोर शिक्षण, आरोग्य हे महत्वाचे प्रश्न असल्याचे सुभाष शिंदे यांनी सांगितले. पोट भरण्यासाठी गावोगाव भटकंती करावी लागत असल्याने शासकीय योजनांची माहितीही मिळत नसल्याचे शिंदे म्हणाले. त्यातच गेल्या काही दिवसांत बहुरूपींना दान देण्याचे प्रमाणही कमी झाल्याने या समाजाच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.