शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Published: March 06, 2017 12:49 AM

वाशी : वाशी शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव (को़) येथे शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला़

वाशी : वाशी शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव (को़) येथे शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला़ वाशी शहरातील एका घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले़ तर पिंपळगाव (को़) येथे एक पानटपरी फोडून चोरट्यांनी मुद्देमाल पळविला आहे़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी येथील दिनेश चंद्रकांत जोशी हे पोलीस स्टेशन रोडवरील टकले यांच्या घरी किरायाने राहतात़ रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला़ घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली आहे. ऐवज किती चोरीस गेला हे मात्र समजू शकले नाही़ पोलीस दलातच नोकरीस असलेले हवालदार बी़बी़जगताप हे शहरातील पारडी रोडवर परिसरात राहतात़ रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न केला़ मात्र, घरातील नागरिक जागे झाल्याने आणि त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी धूम ठोकली़वाशी तालुक्यातील पिंपळगाव (को.) येथील समाधान गोकुळ कोठावळे यांची पानटपरी रविवारी पहाटे चोरट्यांनी फोडली़ पानटपरीतील तीन हजाराच्या आसपास मुद्देमाल लंपास केला आहे़ कोठावळे यांनी पोलिसात तक्रार दिली असून तपास पोलीस नाईक महादेव राऊत करत आहेत़ वाशी येथील चोरीचा तपास हवालदार भाऊसाहेब बोबडे हे करत आहेत. दरम्यान, ठाण्याच्या हद्दीतील तीन गावात चोऱ्यांच्या घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)