शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: April 13, 2015 00:47 IST

उस्मानाबाद / परंडा : उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील शिवाजी नगर भागात व आष्टा (ता़भूम) येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला़

उस्मानाबाद / परंडा : उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील शिवाजी नगर भागात व आष्टा (ता़भूम) येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला़ दोन्ही ठिकाणी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेसह लाखो रूपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला़ तर आष्टा येथील एका महिलेला शस्त्राचा धाक दाखवून मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरामुळे दोन्ही गावासह परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी सांगितले की, सांजा परिसरातील शिवाजी नगर भागात पूजा गंगाधर इंगळे या वास्तव्याला आहेत़ पूजा इंगळे यांच्या घराचा शनिवारी रात्री कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला़ घरातील लोखंडी कपाटातील ४५ हजार रूपयांचे ३१ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले़ याबाबत पांडुरंग भोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोना भोसले हे करीत आहेत़भूम तालुक्यातील आष्टा येथील जनार्धन तुळशीराम गिलबिले हे घराला कुलूप लावून कुुटुंबियांसह माळवदावर झोपले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचा दरवाजा उचकटून आतमध्ये प्रवेश केला़ आतील उतरंडीच्या डेऱ्यात ठेवलेले ७० हजार रूपये रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले़ पहाटेच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यानंतर माळवदावरील गिलबिले कुटुुंबिय खाली आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला़ तसेच आष्टा येथीलच धोंडीबा सोपान जाधव यांच्या घरी अर्चना जाधव या दोन लहान मुलींसह झोपल्या होत्या़ तर दत्तात्रय जाधव हे पाहुण्यासोबत शाळेत झोपायला गेले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास सहा चोरट्यांनी दरवाजा नसलेल्या घराच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला़ चोरट्यांची चाहूल लागताच अर्चना जाधव यांना जाग आली़ त्यावेळी चोरट्यांनी जाधव यांच्या गळ्याला चाकू लावून कानातील कर्णफुले, मंगळसूत्र असा दीड तोळ्याचा ऐवज, दोन मोबाईल व रोख ७०० रूपये चोरून नेले़ या घटनेने आष्टासह परिसरात खळबळ उडाली आहे़