Video: थरारक! बीडला जाणाऱ्या एसटी बसचे एक्सल तुटल्याने समोरचे चाक निखळले
By संतोष हिरेमठ | Updated: May 8, 2024 19:38 IST2024-05-08T19:35:19+5:302024-05-08T19:38:12+5:30
बसचा वेग कमी असल्याने प्रवासी बालंबाल बचावले.

Video: थरारक! बीडला जाणाऱ्या एसटी बसचे एक्सल तुटल्याने समोरचे चाक निखळले
छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानकातून बीडला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचे एक्सल तुटल्याने समोरील चाक निखळून अपघात झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास चिकलठाणा विमानतळाजवळ घडली. बसचा वेग कमी असल्याने प्रवासी बालंबाल बचावले.
सिडको बसस्थानकातून बस रवाना झाल्यानंतर काही अंतरावर विमानतळाजवळ बसच्या समोरील चाकाचे एक्सल तुटले. यामुळे बस जागेवरच थांबली. या घटनेची माहिती चालकाने तातडीने आगार व्यवस्थापक संतोष घाणे यांना दिली. प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली.
बीडला जाणाऱ्या एसटीचे एक्सल तुटून चाक निखळले, प्रवासी बचावले #Chhatrapatisambhajinagar#accidentpic.twitter.com/XnWPYvRUo0
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) May 8, 2024