शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत; महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 7:00 PM

सलीम अली सरोवरातील दूषित पाण्याचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी महापालिकेने याठिकाणी २० कोटी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट सुरू केला. त्यामुळे तलावाला मिळणारे ड्रेनेजचे पाणी शुद्ध होऊनच सरोवरात जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

ठळक मुद्देमासे कशामुळे मेले, याचा शोध घेतला जात असतानाच मृत मासे तलावातून बाहेर काढण्यात आले.याचवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही पाण्याचे नमुने घेतले.

औरंगाबाद : ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील हजारो मासे रविवारी मृत्यूमुखी पडले. सोमवारी महापालिका अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सरोवराची पाहणी केली. मृत माशांचे नमुने विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाला पाठवले आहेत तर पाण्याच्या नमुन्यांची तपासणी स्वत: प्रदूषण नियंत्रण मंडळ करत आहे.

सलीम अली सरोवरातील दूषित पाण्याचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी महापालिकेने याठिकाणी २० कोटी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट सुरू केला. त्यामुळे तलावाला मिळणारे ड्रेनेजचे पाणी शुद्ध होऊनच सरोवरात जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, असे असले तरी सलीम अली सरोवरातील पाणी वारंवार दूषित होत आहे. पाच-सात वर्षांपूर्वीदेखील सरोवरातील हजारो मासे मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर गतवर्षीही मासे मेल्याचा प्रकार घडला. रविवारी पुन्हा मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचे बघायला मिळाले. पाण्यामध्ये माशांना जेवढा ऑक्सिजन मिळायला हवा, तेवढा मिळत नसल्याचे समोर आले आहे. मृत माशांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, सोमवारी सकाळीच महापालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी बी. एस. नाईकवाडे, उपअभियंता अशोक पद्मे, चांडक यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी केली. डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले की, मृत माशांचे नमुने विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाला पाठविण्यात आले आहेत. या तपासणीत माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे स्पष्ट होईल. याचवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही पाण्याचे नमुने घेतले.

मृत मासे केले नष्टमासे कशामुळे मेले, याचा शोध घेतला जात असतानाच मृत मासे तलावातून बाहेर काढण्यात आले. या माशांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना करण्यात आल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.

पुन्हा जलपर्णीचा वेढासरोवरातील जलपर्णींमुळे जलचर प्राणी, विविध प्रकारच्या वनस्पती, वृक्षजाती, प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य धोक्यात आले होते. त्यामुळे येथील जलपर्णी नष्ट करण्याचे काम तत्कालिन महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या उद्यान विभागाने केले होते. परंतु, आता पुन्हा एकदा जलपर्णींचा तलावाला वेढा पडत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाpollutionप्रदूषण