शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

साडेनऊ हजार कामांची माहिती संकेतस्थळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:56 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात झालेल्या साडेनऊ हजार कामांची माहिती या कामांच्या सॅटेलाईट लोकेशन, फोटोसह संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रोहयोच्या कामांचा संपूर्ण लेखाजोखा एका क्लीकवर उपलब्ध झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात झालेल्या साडेनऊ हजार कामांची माहिती या कामांच्या सॅटेलाईट लोकेशन, फोटोसह संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रोहयोच्या कामांचा संपूर्ण लेखाजोखा एका क्लीकवर उपलब्ध झाला आहे.ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होऊन मजुरांचे स्थलांतर थांबावे तसेच त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्याबरोबरच विकासकामे मार्गी लागावीत, या उद्देशाने रोजगार हमी योजना कार्यान्वित झाली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात विविध कामे हाती घेतली जातात. परंतु, ही कामे पूर्ण होतात की नाही, याबद्दल शंका उपस्थित केली जात होती. तसेच तक्रारींची संख्याही वाढली होती. या सर्व बाबींना आळा बसावा, या उद्देशाने राज्य शासनाने रोहयो अंतर्गत पूर्ण केलेल्या कामांचे ‘जीओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे, त्या कामाचा फोटो तसेच त्या कामाचे वेबसाईट लोकेशन संकेतस्थळावर अपलोड केले जात आहे.परभणी जिल्ह्यात आॅगस्ट २०१६ पासून या कामाला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील ३९ पॅनल तांत्रिक अधिकाºयांमार्फत पूर्ण झालेली कामे शोधून या कामांचे छायाचित्र, त्या कामाची संपूर्ण माहिती, कामावर झालेला खर्च, किती मंजुरांनी काम पूर्ण केले, याची अद्ययावत माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्यामुळे रोहयो अंतर्गत झालेली कामे आणि त्यावर झालेला खर्च याची माहिती सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे.रोजगार हमी योजनेतील पूर्ण झालेली कामे आणि या कामांवर झालेल्या खर्चाची माहिती संकेतस्थळावर दिली जात असल्याने या योजनेअंतर्गत होणाºया गैरव्यवहारांनाही आळा बसणार आहे. परिणामी पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या कामांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.