शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विकतच्या पाण्यावरच भागतेय रहिवाशांची तहान

By admin | Updated: April 16, 2015 01:00 IST

बीड: नगरपालिके पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कारंजा रोड वरिल रहिवाशांना आपली तहान विकतच्या पाण्यावर भागवावी लागत आहे. हे वास्तव चित्र बुधवारी बीड शहरात पहावयास मिळाले.

बीड: नगरपालिके पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कारंजा रोड वरिल रहिवाशांना आपली तहान विकतच्या पाण्यावर भागवावी लागत आहे. हे वास्तव चित्र बुधवारी बीड शहरात पहावयास मिळाले. नगरपालिका हाकेच्या अंतरावर असूनही येथील सर्वसामान्य नागरीकांच्या पाणी टंचाईच्या वेदना ना पालिकेच्या अधिकाऱ्यांना समजतात, ना पदाधिकाऱ्यांना. गेल्या दहा दिवसांपासून कारंजा रोड परिसरात पाणी पुरवठा होत नाही. अगोदरच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे छोट्या मोठ्या व्यावसायीकांचे उद्योग धोक्यात आलेले आहेत. अशा स्थितीत येथील व्यापारी, दुकानदारांना जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे तर महिलांना येथे असलेल्या मज्जीदच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहेत. ही स्थिती आजची नाही तर मागील अनेक महिन्यांपासून अशीच स्थिती बीड शहरात असल्याचे पहावयास मिळत आहे.दरम्यान, या भागातील काही रहिवाशांनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्कही केला होता. मात्र, पालिकेकडून केवळ आश्वासनापलिकडे काहीही मिळाले नाही.नागरीक स्वत:हून‘लोकमत’ च्या कार्यालयातमागील चार दिवसापासून बीड शहरातील पाणी टंचाईचे वास्तव स्थिती मांडण्याचे काम ‘लोकमत’ ने वृत्त मालिकेच्या माध्यमातून सुरू केले आहे. आता पर्यंत शहरातील एकनाथ नगर, रामतिर्थ नगर, शनि मंदिर परिसर आदी भागातील पाण्याची भीषण परिस्थिती समोर आली आहे. शहरातील विविध भागातील महिला व नागरीक स्वत:हून ‘लोकमत’ कार्यालयात येऊन आपल्या भागातील पाणी टंचाईचे वास्तव चित्र मांडत आहेत.