यांनाही मिळाले वह्या- पुस्तके, नवे मित्र!

By Admin | Updated: August 19, 2014 02:16 IST2014-08-19T02:02:45+5:302014-08-19T02:16:52+5:30

अशोक कारके , औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प विभागाने गेल्या नऊ वर्षांत साडेतीन हजार बालकामगारांना प्रशिक्षण केंद्रात शिक्षणाची आवड निर्माण करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.

They got books - books, new friends! | यांनाही मिळाले वह्या- पुस्तके, नवे मित्र!

यांनाही मिळाले वह्या- पुस्तके, नवे मित्र!




अशोक कारके , औरंगाबाद
जिल्ह्यातील राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प विभागाने गेल्या नऊ वर्षांत साडेतीन हजार बालकामगारांना प्रशिक्षण केंद्रात शिक्षणाची आवड निर्माण करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यामुळे शाळेपासून वंचित राहिलेल्या या मुला- मुलींना वह्या, पुस्तके, नवे मित्र- मैत्रिणी, अभ्यास, नवे खेळ यांचा आनंद घेता येणार आहे.
शासन आणि समाज व्यवस्थेसमोर बालकामगार ही एक मोठी समस्या उभी असून बालकामगारांचे प्रमाण वाढत आहे. शासनाकडून बालकामगार मुक्तीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. कचरा वेचणारी आणि भीक मागणारी मुले, तसेच बांधकाम, हॉटेल, वीटभट्टी इ. ठिकाणी बालमजुरी करणारी अनेक लहान मुले दिसतात. ज्या वयात मुलांनी शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे गिरविणे आवश्यक आहे. त्याच वयात आजही अनेक मुले विविध ठिकाणी मेहनतीची कामे करीत आहेत. या दुर्लक्षित वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे. परिस्थितीने रस्ता चुकलेल्या या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने २००८-०९ मध्ये जिल्ह्यात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प विभागाची सुरुवात केली होती. याच वर्षी १५१७ बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले होते.

Web Title: They got books - books, new friends!