शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जबरी चोरीसाठी जाणाऱ्या चौघांना पकडले

By admin | Updated: June 18, 2014 01:39 IST

परळी: महिलांचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने कार मध्ये आलेल्या दोन महिलांसह दोन पुरुषांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परळी येथील नाथ्रा परिसरात मुद्देमालासह सोमवारी अटक केली.

परळी: दिवंगत केंद्रीय ग्राम विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमात आलेल्या महिलांचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने कार मध्ये आलेल्या दोन महिलांसह दोन पुरुषांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परळी येथील नाथ्रा परिसरात मुद्देमालासह सोमवारी अटक केली. छबूबाई गोरख जाधव, सखूबाई सखाराम पवार, मंगलनाथ गोरख जाधव तिन्ही रा. खंडेश्वरी मंदिर बीड व किरण मुरलीधर येडवे रा. मुर्शदपूर, ता. बीड असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे चौघे कार क्रमांक एचएच-२३ ई-६७४८ मध्ये परळी येथील या कार्यक्रमात आलेल्या महिलांचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने निघाल्याची माहिती त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. सदरील कार नाथ्रा परिसरात दाखल होताच पोलिसांना त्यांना पकडले. त्यांच्याकडून एक लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परळी ग्रामीण ठाण्यात बबन हिरामण राठोड यांच्या फिर्यादीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तपास पोह शेख करीत आहेत. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि सी.डी. शेवगण, सपोनि भारत जाधव, पोहेकॉ बबन राठोड, पोहेकॉ जयसिंग वाघ, कल्याण औटे, अंकुश महाजन, रविभूषण जाधवर, माया साबळे, रफिक खान यांनी केली. (वार्ताहर)