..यांचे नेते भारी, निष्ठा भारी.. नवा ङोंडाही लई भारी..!
By Admin | Updated: August 22, 2014 00:55 IST2014-08-22T00:55:18+5:302014-08-22T00:55:18+5:30
पक्ष आणि नेत्यांवरील निष्ठेच्या तथाकथित झुली गुंडाळून ठेवत ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची लाट सध्या सोलापूर जिल्ह्यात गतिमान झाली आहे.

..यांचे नेते भारी, निष्ठा भारी.. नवा ङोंडाही लई भारी..!
पक्ष आणि नेत्यांवरील निष्ठेच्या तथाकथित झुली गुंडाळून ठेवत ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची लाट सध्या सोलापूर जिल्ह्यात गतिमान झाली आहे. या लाटेचा फटका काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना जसा बसतो आहे, तसाच राष्ट्रवादीच्या शरद पवारांनादेखील बसतो आहे. जिल्ह्यातील ‘अजितदादा ब्रिगेड’ मात्र हाती येईल त्या सोयीच्या पक्षाचा ङोंडा हाती घेऊन आमदारकी मिळविण्याच्या प्रय}ाला लागली आहे. खा. विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह जिल्ह्यातील आपले अस्तित्व मजबूत करण्याच्या प्रय}ात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात निष्ठेचे अनेक बुरुज ढासळत असल्याचा फायदा घेत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे व जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे व धनंजय डिकोळे यांनी ‘सेना प्रवेश कक्ष’ विस्तारित केला आहे. ‘लोकमंगलकार’ सुभाष देशमुख यांनी नितीन गडकरींचे धरलेले बोट घट्ट पकडत जिल्ह्यातील भाजपावरील आपली मांड पक्की करण्यावर भर दिला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत व्याकूळ असलेला मतदार मात्र एकूण या राजकारणाकडे ‘यांचे नेते भारी.. यांची निष्ठा भारी.. यांच्या हातातला नवा ङोंडाही लईच भारी..!’ असे म्हणताना दिसतो.
जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. राष्ट्रवादी 4, काँग्रेस 2, भाजपा 2, शेकाप 1, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांचे सहयोगी सदस्य झालेले अपक्ष 2 असे जिल्ह्याचे सध्याचे पक्षीय बलाबल आहे. आक्रमक आणि व्यक्तिकेंद्रित राजकारणावर प्रेम करणारा, अशी ख्याती मात्र जिल्ह्याने अबाधित राखली. म्हणूनच शरद पवारांच्या संदेशावर इथले राजकारण दीर्घकाळ चालले. 2क्क्9 साली स्वत: शरद पवारच माढा लोकसभा मतदारसंघातून थेट जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि जिल्ह्याची राजकीय समीकरणोच बदलली. एरव्ही सोलापूर शहर सुशीलकुमार शिंदेंकडे तर जिल्हा विजयसिंह मोहिते-पाटलांकडे अशा सर्वमान्य राजकीय वाटण्या असायच्या.
सांगोल्यातून 5क् वर्षे विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारे आ. गणपतराव देशमुख वयाच्या 88 व्या वर्षी पुन्हा लढणार काय, पंढरपूर-मंगळवेढय़ातून भारत भालके आघाडीकडून लढणार की अन्य पक्षाकडून, सुधाकर परिचारक यांचे पुतणो प्रशांत अपक्ष लढणार की इतर पक्षाचा ङोंडा हाती घेणार, बार्शीत पालकमंत्री दिलीप सोपल-राजेंद्र राऊत यांच्यातील लढतीत ‘तिसरा कौन’ कशी रंगत आणणार, माढय़ात आ. बबनराव शिंदे यांना धवलसिंह मोहिते-पाटील, ज्योती कुलकर्णी, शिवाजी सावंत, भारत शिंदे या सैनिकांबरोबर की कल्याणराव काळे, दादा साठे की संजय घाटणोकर यांच्याशी दोन हात करावे लागणार, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आपली उमेदवारी आणि मतदारसंघ कसा शाबूत राखणार, शहर उत्तरमध्ये भाजपा घरातील भांडणो मिटवून आ. विजयकुमार देशमुखांना पुन्हा संधी देणार काय, अक्कलकोटमधून पुन्हा भाजपाची उमेदवारी मिळवू पाहणा:या आ. सिद्रामप्पांना काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे कसे रोखणार, माळशिरस मतदारसंघात मोहिते-पाटील घराण्याची पुण्याई पुन्हा आ. हणुमंत डोळसांना तारणार काय, अशा मुद्दय़ांभोवती राजकारण फिरते आहे.
1आ. प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य मतदारसंघात कॉ. नरसय्या आडम मास्तर आणि शिवसेनेचे महेश कोठे यांची लढत चुरशीची ठरेल. प्रणितींच्या कामाचा झपाटा, आडम मास्तरांचा लढवय्या बाणा अन् जातीय समीकरणो महत्त्वाची ठरणार.
2बार्शी तालुक्यात दिलीप सोपल यांच्या कामाचा धडाका आणि त्यांच्या विरोधात खंबीरपणो लढण्याचा बाणा दाखवून आव्हान उभे करणारे राजेंद्र राऊत यांच्यात तिस:या कोणाची एन्ट्री होणार, याकडे मतदारांचे लक्ष दिसते.
3करमाळ्यात अजित पवारांचे निष्ठावंत संजय शिंदे निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. अपक्ष किंवा सोयीचा पक्ष हे सूत्र त्यांनी ठेवल्याचे दिसते. आता रश्मी बागल, जयवंत जगताप आणि शिवसैनिक नारायण पाटील कसा डाव मांडणार ? हा खरा प्रश्न आहे.
4नितीन गडकरी यांचे निष्ठावंत माजी खा. सुभाष देशमुख शेवटच्या क्षणी शिवसेनेची जागा भाजपाच्या वाटय़ाला मिळवून मैदानात उतरण्याच्या तयारीत दिसतात. तसे घडले तर आ. दिलीप माने आणि सर्वच पक्षातील इच्छुक कोणती खेळी खेळणार ?