ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइंडचे भयंकर कृत्य; टॉयलेटचा बहाणा करत काचेने स्वतःचा गळा चिरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 01:24 PM2023-10-23T13:24:08+5:302023-10-23T13:25:21+5:30

गळ्याला १२ से.मी. लांब जखम, गळ्यासह हाताला टाके

The dastardly act of a mastermind in a drug case; Glass slits his own throat pretending to be a toilet | ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइंडचे भयंकर कृत्य; टॉयलेटचा बहाणा करत काचेने स्वतःचा गळा चिरला

ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइंडचे भयंकर कृत्य; टॉयलेटचा बहाणा करत काचेने स्वतःचा गळा चिरला

छत्रपती संभाजीनगर : कोकेन प्रकरणात गुजरातच्या डीआरआय पथकाने मास्टरमाइंड जितेशकुमार हिनहोरियाला शहरातून ताब्यात घेतले. मात्र, त्याने टॉयलेटचा बहाणा करत गळा कापून घेतला. गळा कापून घेतलेल्या जितेशकुमारवर शहरातील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गळ्यावर १२ से.मी. लांब जखम झाली असून, त्यावर टाके देण्यात आले आहेत. गळ्याबरोबर हातही कापून घेतल्याने हातालाही टाके घालण्यात आले आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाचे डाॅ. राघवन यांनी दिली.

आरोपी जितेशकुमार हा फिजिक्सचा प्राध्यापक आहे. तो औषधी कंपन्यांतील मशिनरींचा एक्स्पर्ट आहे. तो वेगवेगळ्या केमिकलमधून अंमली पदार्थ बनविण्यासाठीची पावडर वेगळी करण्याचा सेटअप कंपन्यांना तयार करून देतो. आरोपी जितेशकुमार यास शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अटक केली. रविवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास टॉयलेटला जाण्याचा त्याने बहाणा केला. टॉयलेटमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणच्या खिडकीच्या काचेने स्वत:चा हात व गळ्याची नस कापली. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही बाब लक्षात येताच पथकाने जितेशकुमारला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डीआरआयने शहर पोलिसांचे संरक्षण मागितले.

दुपारी अडीच वाजता जितेशकुमार हिनहोरिया यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील ‘एसआयसीयू’मध्ये उपचार सुरू आहेत. गळ्याच्या उजव्या बाजूने जखम झाली आहे. तर, डाव्या हातालाही जखम झाली आहे. गळ्यावरील जखम १२ से.मी. लांब असली तरी खोलवर नसल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. रुग्णालयात ‘एसआयसीयू’ बाहेर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. अनोळखी लोकांना या परिसरात येण्यापासून रोखण्यात येत असल्याचे पाहायला मिळाले.

आरोपीने गळा चिरल्याने पोलिसांची घेतली मदत
जीएसटी महासंचालनालयाने दोन आरोपींना पकडून सिडकोतील क्षेत्रीय कार्यालयात आणले तेव्हा त्यातील एका आरोपीने आपला गळा चिरून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा जीएसटी अधिकाऱ्यांच्या पथकासोबत पोलिस बंदोबस्त नव्हता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तातडीने अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त मागविला. साध्या वेशातील पोलिस सकाळी या कार्यालयात पोहोचले.

तपासणी अधिकारी पोलिस आयुक्तालयात
पोलिस आयुक्तांनी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जीएसटी तपासणी अधिकाऱ्यांना सायंकाळी बोलावले. सायंकाळी ५:४५ वाजता दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन पांढरी कार पोलिस आयुक्तालयाकडे निघून गेली. त्यानंतर ५:५१ वाजता दुसऱ्या गाडीतून एका आरोपीला सिडको पोलिस स्टेशनकडे नेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा ताबा सिडको पोलिसांना दिला.

तीन दिवसांपासून नाही झोप
जीएसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तीन दिवसांपासून आम्ही कंपनीतील हालचालींवर नजर ठेवून होतो. आरोपींना अटक केली. मागील तीन दिवस आम्ही नीट झोपलोही नाही. वडापाव खाऊन दिवस काढले. आजही दिवसभरातून आता वडापाव खायला वेळ मिळाला, आता लगेच आम्ही पोलिस आयुक्तांकडे चाललो आहोत.

चुकीची बातमी पसरवू नका
जीएसटीच्या तपासणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही लेखी स्वरूपात कार्यालयाच्या वतीने कारवाईची अधिकृत माहिती देत आहोत. तोपर्यंत थांबा. काही टीव्ही चॅनलवर चुकीची आकडेवारी व माहिती दिली जात आहे. यामुळे संभ्रम होत आहे. अशी चुकीची आकडेवारी देऊ नका, अशी विनंती त्यांनी सर्व पत्रकारांना केली.

Web Title: The dastardly act of a mastermind in a drug case; Glass slits his own throat pretending to be a toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.