चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाखाली कोसळली; एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 19:56 IST2024-09-19T19:56:35+5:302024-09-19T19:56:40+5:30

निल्लोड फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाखाली कोसळली.

The bike fell under the bridge after losing control; One died on the spot, one injured | चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाखाली कोसळली; एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाखाली कोसळली; एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

सिल्लोड : भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. हा अपघात जळगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर निल्लोड फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान झाला. सैयद जाकेर सैयद रफीक(वय ३२, रा. गेवराई, जि. बीड) असे मृताचे नाव आहे.

बीड येथील सैयद जाकेर व ईमरान अशरफखा पठाण (वय १५) हे दोघे छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकी (एमएच २०, एफएल ९६३४)ने बुधवारी सायंकाळी तांडा बाजार येथील एका लग्नसमारंभाला निघाले होते. मात्र निल्लोड फाट्याजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाखाली कोसळली. यात सैयद जाकेरचा जागीच मृत्यू झाला; तर इमरान पठाण जखमी झाला. नागरिकांनी दोघांनाही सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृत जाकेर हा घरात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे.

Web Title: The bike fell under the bridge after losing control; One died on the spot, one injured