शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षणाला ‘खो’

By admin | Updated: February 3, 2015 00:59 IST

राजेश खराडे , बीड जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादनक्षमता वाढविता येऊ शकते. मात्र, जिल्ह्यात माती व पाणी परीक्षणाला शेतकऱ्यांसह कृषी विभागाने ‘खो’ दिला आहे.

राजेश खराडे , बीडजमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादनक्षमता वाढविता येऊ शकते. मात्र, जिल्ह्यात माती व पाणी परीक्षणाला शेतकऱ्यांसह कृषी विभागाने ‘खो’ दिला आहे. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत आहे. ७ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांपैकी केवळ ४ ते ५ हजार शेतकरी हे वर्षाकाठी माती व पाणी परीक्षण करतात, असा धक्कादायक निष्कर्ष ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून सोमवारी पुढे आला.माती परिक्षण केल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण लक्षात येते. विद्यापीठाने ठरवून दिलेल्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांनी परीक्षणासाठी आणलेल्या मातीमध्ये कमी- जास्त प्रमाण लक्षात आल्यावर येथील कार्यालयातून नत्र, स्फूरद, पलाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक, आदी घटकांचे प्रमाण ठरवून दिले जाते. त्यामुळे जमिनीचा कस व उत्पादनात वाढ करण्यासाठी हे परिक्षण शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. मात्र शेतकरी पारंपारिक शेतीपद्धतीवरच भर देत आहे. केवळ ठिबकसिंचनाचे अनुदान मिळण्याकरिता माती परिक्षण हे बंधनकारक आहे. त्यामुळे परिक्षण केवळ नावाला राहिले असून याचा फायदा ठिबकसिंचनाचे विक्रेतेच करून घेत आहेत. सध्या दुष्काळाची दाहकता अधिक प्रमाणात जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ सेंद्रीय शेतीपद्धतीचा पर्याय उरत आहे. सेंद्रीय पद्धतीने जलसंधारण क्षमता वाढविण्यास मदत होत आहे. पिकांचे अवषेश किंवा शेणखताचा वापर केल्यास दुष्काळी परिस्थितीमध्येही भरघोस उत्पादन मिळते. फक्त सेंद्रीय शेतीकडे शेतकरी गांभीर्याने बघण्याची गरज आहे असे व्यवस्थापक डी.एम.काकडे यांनी सांगितले. रासायनिक खताचा वापर केल्याने पाणी अधिक प्रमाणात लागते. दुष्काळी परिस्थितीमध्ये याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जिल्ह्यातील किती शेतकरी मातीचे परीक्षण करून पिकाची लागवड करतात याविषयी ‘लोकमत’ने सोमवारी सर्वेक्षण केले. यामध्ये परीक्षणाचा उपयोग केला जातो का ? असे विचारले असता केवळ १ टक्का लोकांनी उपयोग करीत असल्याचे सांगितले. यामध्ये कृषी अधिकाऱ्याकडून परीक्षणाविषयी माहिती दिली जाते का ? असे विचारल्यावर केवळ चार टक्के शेतकऱ्यांनी माहिती देत असल्याचे सांगितले. सेंद्रीय शेती करणारे जिल्ह्यात केवळ चार टक्केच शेतकरी आहेत तर एकूण शेतकरी संख्येच्या तुलनेत ०.६८ टक्के शेतकरीच शेतीचे परीक्षण करीत असल्याचे उघडकीस आले.