शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोची कारला धडक; पिता-पुत्र जागीच ठार

By admin | Updated: May 17, 2014 01:14 IST

वैजापूर : भरधाव जाणार्‍या टेम्पोने मारुती कारला जोराची धडक दिल्याने एका दीडवर्षीय चिमुकल्यासह त्याच्या पित्याचा जागीच मृत्यू, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

वैजापूर : भरधाव जाणार्‍या टेम्पोने मारुती कारला जोराची धडक दिल्याने एका दीडवर्षीय चिमुकल्यासह त्याच्या पित्याचा जागीच मृत्यू, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ६.२५ वाजेच्या सुमारास वैजापूर-औरंगाबाद महामार्गावरील जरू ळ फाट्यावर घडली. या प्रकरणी टेम्पो चालकास अटक करण्यात आली आहे. अनिल किशन राठोड (२९) व कार्तिक अनिल राठोड (दीड वर्ष), रा. धानोरा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा असे अपघातातील मृतांची नावे आहेत. अनिल राठोड हे त्यांची पत्नी वंदना, मुलगा कार्तिक व भाऊ सतीश राठोड यांच्यासह मारुती कारमधून (क्र. एमएच-०४-एएच-३८९९) मुंबई येथून बुलढाण्याकडे जात होते. त्याचवेळी समोरून औरंगाबादच्या दिशेने येणार्‍या टेम्पोने (क्र. एमएच-११-टी-७११) कारला जोरदार धडक दिल्याने अनिल राठोड व कार्तिक जागीच ठार झाले. सतीश व वंदना राठोड हे दोघेजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा बिरारी, हवालदार नारायण कटकुरी, पोलीस नाईक बाबासाहेब धनुरे, पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ कणसे व इरफान शेख आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांसह जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. हा अपघात एवढा भीषण होता की, टेम्पोच्या धडकेने कारचा चेंदामेंदा होऊन मृतदेह त्यात फसले गेले. दरम्यान, या प्रकरणी सतीश राठोड, रा. धानोरा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पोचालक मनोज दिलीप झिने (२५), रा. मालगणी, ता. चिखली, जि. बुलढाणा याच्याविरुद्ध वैजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली. कपडे धुण्यासाठी गेलेली विवाहिता बेपत्ता जांबरगाव येथील कविता पोपट साठे (२५) ही विवाहिता दोन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. १३ मे रोजी दुपारी बारा वाजता नातेवाईकाच्या शेतात कपडे धुण्यासाठी जाते म्हणून ती घराबाहेर गेली; मात्र अद्याप घरी परतली नाही, अशी तक्रार तिचा भाऊ दादासाहेब शिंदे यांनी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार वैजापूर पोलीस ठाण्यात तिच्या हरवल्याची नोंद करण्यात आली असून हवालदार नंदकुमार नरोटे व दीपक सुरासे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, सदर वर्णनाच्या महिलेबाबत कुणाला माहिती असल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वैजापूर पोलिसांनी केले आहे.