ओव्हरटेकच्या प्रयत्नात टेम्पो-कारची समोरासमोर धडक; एक ठार, १५ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:40 IST2022-05-05T16:40:33+5:302022-05-05T16:40:58+5:30
भरधाव वेगाने असणाऱ्या दोन्ही वाहनांची ओव्हरटेक करताना समोरासमोर टक्कर झाली.

ओव्हरटेकच्या प्रयत्नात टेम्पो-कारची समोरासमोर धडक; एक ठार, १५ जखमी
सिल्लोड (औरंगाबाद) : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो आणि कारची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन एकजण ठार झाला. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुमनबाई उत्तम वानखेडे ( ७०, रा.कन्नड ) असे मृताचे नाव आहे. हा अपघात जळगाव-औरंगाबाद रोडवरील डोंगरगाव फाट्याजवळ बुधवारी संध्याकाळी झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कन्नड येथून काहीजण कारमधून ( क्रमांक एम एच २० ईई ५०८४ ) कामानिमित्त उंडणगावला जात होते. तर टेम्पो ( क्रमांक एम एच ०४ ई बी ००३४ ) सिल्लोडकडे येत होता. भरधाव वेगाने असणाऱ्या दोन्ही वाहनांची ओव्हरटेक करताना समोरासमोर टक्कर झाली. अपघातात सुमनबाई उत्तम वानखेडे ( ७०, रा.कन्नड ) यांचा मृत्यू झाला.
जखमी प्रवास्यांची नावे अशी: जयाबाई किसन वानखेडे, सुनीता शामराव आळने, लक्ष्मीबाई म्हातारजी मोरे, यश विठलं वानखेडे, विठलं भिका वानखेडे, योगेश भीमराव बनसोडे, ठगणाबाई महादू केसापुरे, छाया विठलं वानखेडे, रेखा योगेश बनसोडे, गयाबाई गणेश मोरे, गणेश सखाराम मोरे, हिराबाई बाबुराव केसापुरे, रंगुबाई लक्ष्मण मोरे, निर्मला बाई कैलास वानखेडे, कैलास शामराव मोरे सर्व रा.कन्नड हे प्रवाशी जखमी झाले. यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय प्रथम उपचार करण्यात आले. यापैकी हिराबाई केसापुरे रा. सिल्लोड, विठलं वानखेडे , कैलास रामराव मोरे, योगेश भीमराव बनसोडे ( रा.कन्नड ) चार गंभीर जखमींवर औरंगाबाद येथे उपचार करण्यात येत आहेत.