शिक्षकाने विद्यार्थिनीला छेडले

By Admin | Updated: December 23, 2015 23:35 IST2015-12-23T23:28:26+5:302015-12-23T23:35:14+5:30

हिंगोली :खंडाळा जि. प. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने दारुच्या नशेत चक्क विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना घडल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली.

The teacher punched the student | शिक्षकाने विद्यार्थिनीला छेडले

शिक्षकाने विद्यार्थिनीला छेडले

हिंगोली : तालुक्यातील खंडाळा जि. प. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने दारुच्या नशेत चक्क विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडल्याची तक्रार हिंगोली ग्रामीण पोलिसांत देण्यात आली.
पोलिसांना ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार खंडाळा येथील जि. प. प्राथमिक शाळेत दिलीप नारोबा मगर हे एका वर्षापासून कार्यरत आहेत. परंतु २३ डिसेंबर रोजी शाळेतील तीन शिक्षकांनी सुट्टी घेतल्याने सर्व कारभार मगर यांच्यावरच सोपवलेला आला होता. परंतु शिक्षक मगर यांनी सकाळी शाळेला येताना सोबत दारुच्या बाटल्या आणल्या होत्या. परिपाठ झाल्यानंतर मगर यांनी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले. या नशेत त्यांनी विद्यार्थ्यांनाही बेदम मारहाण केली. एका विद्यार्थिनीची छेड काढली. ती रडतच घरी गेली अन् नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. त्यांनी शाळेकडे धाव घेत शिक्षकास बेदम चोप दिला. हा प्रकार ग्रामीण पोलिस ठाण्यात सपोनि नागोराव मुंढे यांना दिली. त्यांनी थेट खंडाळा गाठून शिक्षकाला ताब्यात घेतले. तसेच टेबलवर ठेवलेल्या दारुच्या बाटल्या जप्त करून ठाण्यात आणले. त्यापाठोपाठ पालकवर्ग आला. तरीही शिक्षकाचे बरळणे सुरू असल्याने पुन्हा प्रसाद खावा लागला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या प्रकारामुळे खंडाळा गावात खळबळ माजली असून शैक्षणिक क्षेत्रालाही हादरा बसला आहे.

Web Title: The teacher punched the student