शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समित्या निवडीवरून तंटे

By admin | Updated: July 1, 2014 01:02 IST

कडा: गावात निर्माण झालेले तंटे गावातच सोडविले जावेत या उद्देशाने सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या समिती स्थापनावरूनच गावा-गावात वाद होऊ लागले आहेत.

कडा: गावात निर्माण झालेले तंटे गावातच सोडविले जावेत या उद्देशाने सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या समिती स्थापनावरूनच गावा-गावात वाद होऊ लागले आहेत. यामुळे अनेक ठिकाणच्या समित्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यामुळे वर्षभरात १२२ पैकी एकाही समितीने एकही तंटा मिटविलेला नाही. यामुळे या समित्यांना आपल्या कामांचा विसर पडल्याचा आरोप होत आहे. आष्टी तालुक्यातील आष्टी, अंभोरा या पोलीस ठाण्यांतर्गत १२२ ग्रामपंचायती येतात. या गावांमध्ये उद्भवलेले वाद गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीम राबविण्यात येते. यासाठी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारीही प्रयत्न करतात. गावामध्ये तंटे होऊन ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा तंट्यामुळे ग्रामस्थांना पोलीस ठाण्यात खेटे घालावे लागतात. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड तर पडतोच; शिवाय वेळही वाया जातो. असे प्रकार आष्टी तालुक्यात होऊ नयेत यासाठी १२२ ठिकाणी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. असे असले तरी धानोरा, डोंगरगण, शेरी, जळगाव, हातोला, धामनगाव, दौलावडगाव, सावरगाव, कारखेलसह इतर एकाही ठिकाणच्या समितीने या वर्षात एकही तंटा मिटविला नसल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. यासह अनेक ठिकाणच्या समित्या केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते. या समितीचे अध्यक्षपद हे ग्रामसभेने ठरविणे गरजेचे असते. अध्यक्षपदासह सदस्यही ग्रामपंचायतने ठरविणे अपेक्षीत आहे. असे असताना आष्टी तालुक्यातील अनेका ठिकाणच्या समित्यांमधील अध्यक्षांसह सदस्यही सरपंच व ग्रामसेवकांनी परस्परच ठरविले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे. या समित्यांमधील अध्यक्ष व सदस्य ग्रामस्थांना विचारात न घेता निवडले गेल्याने इतर ग्रामस्थांमध्ये या समित्यांविषयी रोष आहे. यामुळे गावामध्ये निर्माण झालेला तंटे सोडविण्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा यावरही खल होतो. सदरील योजना २००५ पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये ग्रामपंचायतला जिल्हा तसेच राज्य स्तरीय बक्षीसही देण्यात येते. यामुळे सुरुवातीला या मोहिमेमध्ये ग्रामपंचायतने हिरीरीने सहभाग घेतला होता. आता मात्र या समित्यांमध्ये राजकारण शिरू लागल्याने अनेक ठिकाणी या समित्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यामुळे योजनेच्या उद्देशालाच खीळ बसली आहे. यामुळे या समित्यांमध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी दादा गव्हाणे, सचिन वाघुले यांनी केली आहे. आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या शेतीच्या बांधासह इतर किरकोळ कारणांवर वाद होत आहेत. असे प्रकार मिटविण्यासही कोणी पुढाकार घेत नाही. असे प्रकार होऊ नये, म्हणून काही समित्यांना पुनर्रचना करण्याची मागणी अशोक वाघुले यांनी केली आहे. पोनि शशिकांत डोके म्हणाले, समित्यांविषयी वाद मिटवू व तंटे मिटविण्याचे प्रयत्न करू. (वार्ताहर)