परभणीतील जायकवाडीतच व्हावे तालुका क्रीडा संकुल

By Admin | Updated: May 23, 2014 01:10 IST2014-05-23T00:43:23+5:302014-05-23T01:10:30+5:30

परभणी : परभणी तालुक्याचे तालुका क्रीडा संकुल शहरातील जायकवाडी भागातील शासकीय जागेतच उभारावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक जागृत मंचने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

Talukka sports complex in Parbhani can be done in Jaikwadi | परभणीतील जायकवाडीतच व्हावे तालुका क्रीडा संकुल

परभणीतील जायकवाडीतच व्हावे तालुका क्रीडा संकुल

परभणी : परभणी तालुक्याचे तालुका क्रीडा संकुल शहरातील जायकवाडी भागातील शासकीय जागेतच उभारावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक जागृत मंचने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. परभणीत तालुका क्रीडा संकुल उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे क्रीडा संकुल जायकवाडी परिसरात व्हावे, यासाठी नगरसेविका वनमाला देशमुख यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. याच अनुषंगाने ज्येष्ठ नागरिक जागृत मंचने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, जायकवाडीतील मोकळ्या जागेत क्रीडा संकुल उभारल्यास या जागेवरील होत असलेल्या अतिक्रमणास रोख बसेल त्याचप्रमाणे जागेचे होणारे नुकसानही टाळता येणार आहे. या भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. क्रीडा संकुल या ठिकाणी झाल्यास त्याचा फायदा मॉर्निंग वॉकसाठी ज्येष्ठ नागरिकांना होऊ शकतो. तेव्हा जायकवाडीतील मोकळ्या जागेतच क्रीडा संकुल उभारावे, अशी मागणी परभणी येथील ज्येष्ठ नागरिक जागृत मंचच्या वतीने जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)जायकवाडीच्या शासकीय जागेत क्रीडा संकुल उभारल्यानंतर याच भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यास महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा,अशी मागणीही ज्येष्ठ नगारिक जागृत मंचचे अध्यक्ष डॉ.मो.अ.गफ्फार, सुरेश जोशी, पद्माकर देशपांडे, एम.एस. बोधने, नसीर अहमद खान आदींनी केली आहे.

Web Title: Talukka sports complex in Parbhani can be done in Jaikwadi