शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

नवे अप्रशिक्षित कर्मचारी घेण्यापेक्षा आम्हाला सेवेत घ्या

By admin | Updated: November 19, 2014 01:00 IST

औरंगाबाद : जीटीएल कंपनी नफ्यात होती. महिन्याला वीज बिलाच्या माध्यमातून ११० कोटी रुपये मिळत होते. महावितरण आणि जीटीएलच्या अर्थकारणाच्या वादात

औरंगाबाद : जीटीएल कंपनी नफ्यात होती. महिन्याला वीज बिलाच्या माध्यमातून ११० कोटी रुपये मिळत होते. महावितरण आणि जीटीएलच्या अर्थकारणाच्या वादात १,०३२ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. महावितरण कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करून घेणार आहे. त्यांना कंत्राट देण्यापेक्षा आम्हाला सेवेत घ्यावे, अशी मागणी जीटीएल कर्मचारी कृती संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, कंपनीने आम्हाला नोटीस दिली नाही. कंपनीत रुजू होताना १५ वर्षे नोकरी राहील, असे सांगितले होते. कंपनी महिन्याला ११० कोटी रुपये वीज बिलापोटी वसूल करीत होती. महावितरणकडे आठ ते नऊ महिने कंपनीने पैसे भरले नाहीत. त्यावेळी महावितरणचे अधिकारी काय करीत होते, असा प्रश्न समितीने उपस्थित केला. आमच्याकडे पात्रता आणि कामाचा अनुभव आहे. महावितरणने खाजगी कंत्राटदाराकडून अप्रशिक्षित कर्मचारी घेण्यापेक्षा आम्हाला सेवेत घ्यावे. आम्हाला शहराची पूर्ण माहिती आहे. त्याचा फायदा ग्राहकांना सेवा देताना होईल, असे समितीने सांगितले. महावितरणने सेवेत न घेतल्यास लवकरच कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला. यावेळी विजय पुरी, गजानन ढासलेकर, सतीश करपे, अरुण घागरे, प्रशांत सिरसाठ आदी कर्मचारी उपस्थित होते.वाळूज एमआयडीसी परिसरातून एक महिन्याच्या वीज बिलापोटी ५५ ते ६० कोटी रुपये आम्ही वसूल करीत होतो. त्यामुळे कंपनी तोट्यात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असा दावा कर्मचाऱ्यांनी केला. मुंबईतून धमकीचे फोन४कंपनीकडे दोन दिवसांत राजीनामा लिहून द्या. जे काही मिळतील ते पैसे घ्या; अन्यथा काहीच मिळणार नाही, असे मुंबईतून फोन येत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.कंपनीने ३० ते ४० कर्मचाऱ्यांना चेक दिले आहेत; पण ते कशाचे पैसे आहेत, हे सांगितले जात नाही. कंपनीचे अधिकारी चेक देताना राजीनामा आणि इतर काही पत्रांवर स्वाक्षऱ्या घेत आहेत. चेक दिले; पण ते होल्डवर ठेवले आहेत, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.