शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

खासदार विकास योजनेतून कसबे तडवळे दत्तक : अमर साबळे

By admin | Updated: April 27, 2015 01:00 IST

उस्मानाबाद : महार-मांग-वतनदार परिषदेच्या निमित्ताने भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर हे कसबे तडवळे या गावात आले होते़ त्यामुळे कसबे तडवळे हे गाव आपण खासदार विकास

उस्मानाबाद : महार-मांग-वतनदार परिषदेच्या निमित्ताने भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर हे कसबे तडवळे या गावात आले होते़ त्यामुळे कसबे तडवळे हे गाव आपण खासदार विकास योजनेतून दत्तक घेतले आहे़ या ऐतिहासिक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार असून, गावात स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती भाजपा खा. अमर साबळे यांनी दिली़धनंजय शिंगाडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या खासदार अमर साबळे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी ते बोलत होते़ यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, मिलिंद पाटील, संजय निंबाळकर, संजय दूधगावकर, धनंजय शिंगाडे आदीची प्रमुख उपस्थिती होती़ साबळे म्हणाले, राजकारणापूर्वी आपण पत्रकारितेत वीस वर्षे काम केले आहे़ त्यामुळे पत्रकारांच्या समस्या, अडचणींबाबत आपण सभागृहात आवाज उठविणार आहोत़ भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेले अंबवडे (जि़रत्नागिरी) हे गाव आपण खासदार विकास योजनेतून यापूर्वीच दत्तक घेतले आहे़ या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत़ महार-मांग-वतनदार परिषदेच्या निमित्ताने कसबे तडवळे गावातही डॉ़ बाबासाहेब आंबेडकर आले होते़ या गावाचाही सर्वांगिण विकास करण्यासाठी खासदार विकास योजनेतून हे गाव दत्तक घेत असल्याचे ते म्हणाले. रजाकाराप्रमाणेच अलिकडील काळात एमआयएम हे विषारी विचार समाजात पेरण्याचे काम करीत असल्याचा आरोपही साबळे यांनी केला. पावसाळ्यातील छत्रीप्रमाणे उगवलेल्या या पक्षाला काही दलित संघटनेचे स्वार्थी नेते मदत करीत असल्याचे सांगत, विषारी विचार पेरणाऱ्यांना साथ देणे म्हणजे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रतारणा करण्यासारखा प्रकार असून, या अशा अभद्र युतीच्या विरोधात यल्गार पुकारण्यासाठीही हा दौरा असल्याचे साबळे यावेळी म्हणाले़ शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेवून काँग्रेसनेही ६० वर्षे सत्ता भोगली, मात्र, विकास झाला नाही़ मात्र, भाजपाचे सरकार ६० महिन्यात चांगली विकास कामे करून दाखवेल, असा विश्वासही साबळे यांनी व्यक्त केला़ (प्रतिनिधी)