शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

खासगीत मात्र देतात ‘स्वबळाचा नारा’

By admin | Updated: June 20, 2014 01:17 IST

औरंगाबाद : ठीक आहे, त्यांना शक्ती अजमावयाची असेल तर एकदा होऊन जाऊद्या, असे आव्हान देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते खासगीत बोलताना ‘स्वबळाचा शड्डू’ ठोकतात.

औरंगाबाद : ठीक आहे, त्यांना शक्ती अजमावयाची असेल तर एकदा होऊन जाऊद्या, असे आव्हान देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते खासगीत बोलताना ‘स्वबळाचा शड्डू’ ठोकतात; परंतु प्रत्यक्ष उघड बोलताना पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हास मान्य असल्याचे सांगत आमच्याच पक्षाची ताकद मोठी असल्याचा दावा मात्र न चुकता करीत आहेत. जागा वाढवून मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांनी सुरू केलेल्या दबाब तंत्रावर दोन्ही काँग्रेसचे स्थानिक पुढारी व कार्यकर्ते आपल्या प्रतिक्रिया नोंदवीत आहेत. खासगीत बोलताना हे कार्यकर्ते व नेते स्वतंत्र लढण्याची भाषा करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची धुळधाण उडाली; परंतु काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला दोन जागा जास्त मिळाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचा जोर वधारल्याचे त्यांच्या कृतीतून दिसते आहे, तर दबाव तंत्राचे त्यांचे नाटक नेहमीचेच आहे. त्यांना अधिक भाव देऊ नये, असे सांगतानाच स्वबळावर लढल्यास राष्ट्रवादीला त्यांची जागा दिसेल, असे मत काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते व्यक्त करतात.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे म्हणतात की, लोकसभा निवडणुकीनंतर तरी काँग्रेसने आता भानावर येणे आवश्यक आहे. दोन्ही पक्षांनी अर्ध्या-अर्ध्या जागांवर लढले पाहिजे. शेवटी पक्ष संघटना म्हणून राष्ट्रवादीच बळकट आहे, तर शहराध्यक्ष मुश्ताक अहमद त्यापुढेही जाऊन सांगतात की, आम्हाला आता प्रत्येक मतदारसंघातून काम करण्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघातून पक्षाचा संभाव्य उमेदवार कोण असावा, याची चाचपणी आम्ही करीत आहोत. आम्ही सातत्याने जनतेच्या संपर्कात आहोत. जनतेची कामे करीत आहोत. पक्षनेत्यांनी आदेश दिल्यास आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. काँग्रेसचे किरण पाटील म्हणतात की, काँग्रेस नेत्याची प्रतिमा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तुलनेत चांगली आहे. काँग्रेस नेतृत्व संयमी असून बेलगाम नाही.लोकसभेत फटका बेलगाम प्रवृत्तीचा बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया म्हणाले की, पक्षश्रेष्ठी आदेश देतील, त्याप्रमाणे आम्ही काम करू.राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडचे डॉ. जितेंद्र देहाडे यांचे मत असे की, राष्ट्रवादीचा हा फॉर्म्युला जुनाच आहे. ते अगोदर दबाब वाढवीत नेतात, नंतर सरेंडर होतात.काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम सावध प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शहरात आमचीच ताकद अधिक आहे; परंतु निर्णय राज्याच्या नेतृत्वाने घ्यायचा आहे. आम्ही तिन्ही मतदारसंघांतून लढू शकतो; परंतु यातून विरोधकांचा फायदा होऊ शकतो. हे होऊ नये, असे वाटते; परंतु नाइलाज झालाच तर कठोर निर्णय घ्यावाही लागेल.काँग्रेसने मोठेपणा दाखवावामध्यम मार्ग सुचविताना सुधाकर सोनवणे सांगतात की, लोकसभेत काही मतदारसंघांतून आमच्याकडे उमेदवार नव्हता. मग आम्ही ती जागा काँग्रेसला दिली. तसाच मोठेपणा काँग्रेसने दाखवावा. जेथे त्यांचे उमेदवार सतत पराभूत होतात, त्या जागा त्यांनी राष्ट्रवादीला द्यायला काय हरकत आहे.