कर्णपुरा यात्रेत फुगे विक्रेता चिमुकलीला सुसाट टेम्पोने चिरडले; डोळ्यासमोर लाडक्या लेकीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 12:02 IST2024-10-11T12:01:27+5:302024-10-11T12:02:09+5:30

छत्रपती संभाजीनगरात ‘हिट अँड रन’ च्या २४ तासात पुन्हा दोन घटना

Susat tempo crushes little girl selling balloons in Karnapura Yatra; He died in front of his parents | कर्णपुरा यात्रेत फुगे विक्रेता चिमुकलीला सुसाट टेम्पोने चिरडले; डोळ्यासमोर लाडक्या लेकीचा मृत्यू

कर्णपुरा यात्रेत फुगे विक्रेता चिमुकलीला सुसाट टेम्पोने चिरडले; डोळ्यासमोर लाडक्या लेकीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : इवल्याशा हातात फुगे घेऊन कर्णपुरा यात्रेत तिच्याच वयाच्या मुलांना फुगे विकणाऱ्या सहा वर्षाच्या सोना सुलतान सोळंके या चिमुकलीचा सुसाट टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी ९.३० वाजता कर्णपुरा यात्रा परिसरात हा अपघात घडला.

गंगापूर तालुक्यातील आसेगावचे सोळंके कुटुंब विविध यात्रेत फुगे, अन्य खेळण्या विकते. काही दिवसांपूर्वीच ते कर्णपुरा यात्रेसाठी शहरात आले. गुरुवारी पहाटेपासून सोनाने यात्रेत आई- वडिलांसह फुगे विकले. त्यानंतर ९.३० वाजता आजीसोबत आंघोळीसाठी पदमपुऱ्याच्या दिशेने ती रस्ता ओलांडत होती. यावेळी रेल्वेस्थानकाकडून सुसाट उड्डाणपूल चढणाऱ्या विटा वाहणाऱ्या टेम्पोच्या (एम एच १२ - जीटी २०२२) चाकाखालीच सोना सापडून चिरडली गेली. डोळ्यासमोर लाडक्या मुलीच्या मृत्यूमुळे आई- वडिलांसह आजीने मात्र टाहो फोडला होता.
 

Web Title: Susat tempo crushes little girl selling balloons in Karnapura Yatra; He died in front of his parents