शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
4
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
5
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
7
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
8
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
9
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
10
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
11
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
12
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
13
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
14
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
15
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
16
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
17
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
18
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
19
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
20
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदी सूर्यतळ, उपाध्यक्षपदी खुराणा

By admin | Updated: July 16, 2014 00:50 IST

हिंगोली : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता सूर्यतळ यांची तर उपनगराध्यक्षपदी जगजितराज खुराणा यांची मंगळवारी निवड करण्यात आली.

हिंगोली : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता सूर्यतळ यांची तर उपनगराध्यक्षपदी जगजितराज खुराणा यांची मंगळवारी निवड करण्यात आली.
हिंगोली नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी राष्ट्रवादीच्या अनिता सूर्यतळ यांचाच एकमेव अर्ज असल्याने त्यांची मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता नगरपालिकेत झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी खुदाबक्ष तडवी यांनी जाहीर केले. उपनगराध्यक्षपदासाठी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य झाले. या पदासाठी माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे व जगजितराज खुराणा या दोघांनी उमेदवारी दाखल केली होती. पक्षाचे निरीक्षक अरविंद चव्हाण व आ. रामराव वडकुते यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहात प्रत्येक नगरसेवकाच्या खाजगी मुलाखती घेतल्या. त्यानंतर या पदासाठी जगजितराज खुराणा यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यामुळे माजी नगराध्यक्ष लुंगे नाराज झाले. त्यांची नाराजी दुर करण्यात माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांना यश आले. त्यानंतर लुंगे यांनी उमेदवारी परत घेतली. नगराध्यक्ष निवडीनंतर पीठासन अधिकारी तडवी यांनी या पदासाठी खुराणा यांचाच एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक बिरजू यादव, अनिल नैैनवाणी, निहाल शेख, सुरेखा शरद जयस्वाल, आमेर अली, एन. एफ. बांगर, अ‍ॅड. भुक्तर, आशाताई उबाळे, आरेफ शेख, सुधीर सराफ, खय्युमखॉ पठाण, नगरसेविका अग्रवाल, गणेश बांगर, श्रीराम बांगर, सुभाष बांगर, मनसे जिल्हाध्यक्ष बंडु कुटे, जहिरखॉं पठाण, शरद जयस्वाल, मिलींद उबाळे आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. त्यानंतर नवनियुक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)
पाच नगरसेवक गैैरहजर
उपनगराध्यक्षपदासाठी गणेश लुंगे इच्छुक होते; परंतु त्यांची या पदावर वर्णी लागली नसल्याने ते या निवड प्रक्रियेच्या वेळी गैरहजर होते. या शिवाय नगरसेविका वसंताबाई लुंगे, निर्गुना बोथीकर, शेख शाहिन बेगम व मनसेच्या रेखाताई गोटरे या नगरसेवकांची यावेळी अनुपस्थिती होती.
मुलभूत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य- सूर्यतळ
हिंगोली शहरातील मुलभूत प्रश्न सोडविण्यास आपले प्राधान्य राहिल. शिवाय पालिकेतील सर्व ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेवून विकास कामे करण्यास कटीबद्ध राहणार आहे. शहरातील नागरिकांनीही त्यांच्याकडील कराचा वेळेवर भरणा करून पालिकेला लोकोपयोगी योजना आणण्यासाठी मदत करावी, अशी प्रतिक्रिया नुतन नगराध्यक्ष अनिता सूर्यतळ यांनी दिली.
उपाध्यक्षपदावरून नाराजी नाट्य
उपनगराध्यक्षपदासाठी गणेश लुंगे व जगजीत खुराणा यांनी उमेदवारी दाखल केली होती.
पक्ष निरीक्षक चव्हाण व आ. वडकुते यांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या मुलाखतीत खुराणा यांच्या बाजूने अनेक नगरसेवकांनी मत नोंदविले. त्यामुळे त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली.
नाराज झालेल्या गणेश लुंगे यांनी प्रक्रियेकडे पाठ फिरविली.