घाटीतील एनआयसीयूमध्ये यंदा सुपरस्पेशालिटी पदव्युत्तर अभ्यासक्रम

By Admin | Updated: June 17, 2014 01:09 IST2014-06-17T00:52:34+5:302014-06-17T01:09:58+5:30

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात (एनआयसीयू) एम.डी. डी.सी.एच. हा सुपरस्पेशालिटी पदव्युत्तर फेलोशिप अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे.

This superconducted postgraduate course in NICU in the valley | घाटीतील एनआयसीयूमध्ये यंदा सुपरस्पेशालिटी पदव्युत्तर अभ्यासक्रम

घाटीतील एनआयसीयूमध्ये यंदा सुपरस्पेशालिटी पदव्युत्तर अभ्यासक्रम

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या नवजात शिशू अतीव दक्षता कक्षामध्ये (एनआयसीयू) एम.डी. डी.सी.एच. हा सुपरस्पेशालिटी पदव्युत्तर फेलोशिप अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पथकाने या विभागाची नुकतीच तपासणी केली.
याविषयी अधिक माहिती देताना विभागप्रमुख डॉ. एल.एस. देशमुख म्हणाले की, नवजात बालकांना इन्टेन्सिव केअर युनिटमधील उपचारांची गरज असते. अशा बाळांवर उपचार करणारे जास्तीत जास्त तज्ज्ञ डॉक्टर झाले पाहिजेत, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही एम.डी.डी.सी.एच. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पाठविला होता. ३१ मे रोजी विद्यापीठाचे पथक येथे येऊन पाहणी करून गेले आहे.
डी.सी.एच. हा कोर्स दीड वर्षाचा आहे, तर एम.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही कोर्सला प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असेल. आगामी शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमास परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: This superconducted postgraduate course in NICU in the valley