शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर पॉवर’ कंपनीने गंडविले

By admin | Updated: August 2, 2014 01:42 IST

हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये केबीसी मल्टीट्रेड कंपनीपाठोपाठ ‘सुपर पॉवर’कडून फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येत आहेत.

हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये केबीसी मल्टीट्रेड कंपनीपाठोपाठ ‘सुपर पॉवर’कडून फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. डिग्रस कऱ्हाळे येथे जवळपास एक कोटीची गुंतवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर औंढा तालुक्यातील लाख येथील १५ जणांना या कंपनीने गंडविल्याची तक्रार आहे.लाख येथील काही ग्रामस्थांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांना भेटून ‘सुपर पॉवर’ कंपनीकडून फसवणूक झाल्याचे सांगितले. यावेळी राकाँचे मनिष आखरे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे उपस्थित होते. यासंदर्भात औरंगाबाद येथे गुन्हा दाखल झालेला असल्याने गुंतवणूकदारांनी थेट त्याच ठिकाणी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, अशा सूचना सुचना दाभाडे यांनी दिल्या. लाख येथील विश्वनाथ लोंढे, संभाजी लोंढे, विठ्ठल लोंढे, ज्ञानेश्वर बाबूराव लोंढे, प्रल्हाद चव्हाण इत्यादी १५ जणांनी २० लाख रूपये ‘सुपर पॉवर’मध्ये गुंतवले असून कंपनीने त्यांना पुढील तारखेचे धनादेश दिले आहेत. या गुंतवणूकदारांनी पैसे औरंगाबाद येथेच भरलेले असल्याने त्यांना तिकडे तक्रारी नोंदवण्यास सांगण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्ांकर सिटीकर यांनी दिली. तसेच लाख येथील गुंतवणूकदारांना मूळ कागदपत्रे व कंपनीने दिलेले धनादेश घेऊन शनिवारी येण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणानंतर आणखी काही तक्रारदार समोर येण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. केबीसीतही एकापाठोपाठ तक्रारदार पुढे येत होते. (प्रतिनिधी)मारहाणप्रकरणी गुन्हा हट्टा : वसमत तालुक्यातील आडगाव येथे प्लॉटच्या कारणावरून बालासाहेब वैद्य यांना मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपी राम ज्ञानोबा वैद्य याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोना हेेंद्रे करीत आहेत.केबीसीची चौकशीही संथ केबीसी प्रकरणात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. मात्र त्यातील अनेकजण समोर आले नाहीत. जे समोर आले त्यांनाही पोलिसांच्या संथपणाचा अनुभव येत आहे. मागील काही दिवसांपासून या प्रकरणात केवळ जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याचेच सांगितले जाते. मात्र त्यानंतर नेमके काय करणार याचा पत्ता नाही. यामुळेच की काय सुपर पॉवर प्रकरणातही लोक फारसे पुढे यायला तयार होत नाहीत. त्यामुळे पोलिसांना तो विश्वास निर्माण करावा लागणार आहे.