शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

अचानक नाकाबंदी; ४० वाहनांची तपासणी

By admin | Updated: September 11, 2014 00:37 IST

जालना : शहर आणि जिल्ह्यात साजरे होणारे सण आणि उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही मार्गावर अचानक नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहिम राबविण्यात येईल,

जालना : शहर आणि जिल्ह्यात साजरे होणारे सण आणि उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही मार्गावर अचानक नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहिम राबविण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी सांगितले. आज बुधवारी शहराच्या विविध भागात जाऊन सिंह यांनी वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. रस्ता अडवून उभी असणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. सकाळी ११ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत सिंह या पथकासह शहरात फिरून आढावा घेत होत्या. जवळपास २५ ते ३० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आले.शहरातील वाढते अतिक्रमण आणि चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आल्याने वाहतूकीचा खोळंबा होत असल्याची खंत व्यक्त केली.शहरातील व्यापारी संकुलनासाठी वाहन तळासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली नाही. त्यामुळे व्यापारी संकुुलात आपल्या कामकाजानिमित्ताने आलेल्या लोकांना वाहने थेट रस्त्यावर उभी करावी लागतात. त्याचा त्रास वाहतूकीला होतो.परिणामी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास होतो. वाहनातील इंधन मोठ्या प्रमाणात नाहक जाळले जाते. या बाबीचा विचार करून वाहतूकीचा अडथळा दूर करण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने नियोजन करण्याची गरज असल्याचे सिंह यांनी सांगितले.पोलिस अधीक्षकांसोबत त्यांच्या विशेष पथकातील जमादार डी.के. हवाले, रामेश्वर जाधव, रामेश्वर बगाटे, राजू पवार, इरशाद पटेल, साई पवार, रेखा लाटे, जया जायस्वाल, चालक निवृत्ती फड यांच्यासह विविध पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हजर होते. (प्रतिनिधी)तीनसीटवर कारवाईदुचाकीवर तीन जण बसून जाणाऱ्या चार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. नाथानी हायस्कूल, शिवाजी पुतळा, कादराबाद चौकी, गरीबशहा बाजार, वाहतूक शाखा कार्यालय, मामा चौक, मोंढ्याकडून मुर्गी तलाव चौकी, बडी सडक, शिवाजी पुतळा, पोस्ट आॅफीस, मंठा चौफुली, मंठा चौफुलीच्या पुढे पेट्रोल पंपावर नाकाबंदी करण्यात आली. या ठिकाणी तालुका ठाण्याचे सहायक निरीक्षक काळे यांनी वाहन तपासणी करीत होते. त्यांना वाहन तपासणीच्या सूचना केल्या. शहरात जड वाहने जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.