शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सोयीऐवजी गैरसोयीच वाढल्या

By admin | Updated: July 29, 2014 01:08 IST

रेणापूर : येथील बसस्थानकात गैरसोयी वाढल्याने प्रवाशांचे हाल होत आहे़

रेणापूर : येथील बसस्थानकात गैरसोयी वाढल्याने प्रवाशांचे हाल होत आहे़ प्रवाशांऐवजी मोकाट जनावरांचा वावर वाढला असून, घाणीच्या साम्राज्यामुळे दुर्गंधी पसरत आहे़ समस्यांच्या विळख्यातून बसस्थानकाची मुक्तता कधी होणार, असा सवाल होत आहे़रेणापूर हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी बसस्थानक बांधण्यात आले़ या बसस्थानकाची विशेष देशभाल नसल्यामुळे प्रवाशांच्या सुविधाऐवजी गैरसोयीच जास्त वाढल्या आहेत़ या बसस्थानकातून दररोज परभणी विभागाच्या गाड्यांच्या दहा फेऱ्या, बीड विभागाच्या चार फेऱ्या तर लातूर आगाराच्या साठ ते सत्तर फेऱ्या होतात़ स्थानकातून अहमदपूर, खरोळा, पानगाव, धवेली , कारेपूर, किनगाव, गंगाखेड मार्गे परळी, पट्टी वडगाव आदी भागात गाड्या धावतात़ बसस्थानकामध्ये एकही बस मुक्कामी मुक्कामी राहत नाही़ रेणापूरपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या पिंपळ फाटा येथून परभणी, औरंगाबाद, जालना, जिंतूर, बीड, परळी, मानवत, हिंगोली, परतूर, माजलगाव, धारूर, नाशिक, शिर्डी आदी जलद गाड्या रेणापूर बसस्थानकात न येता व पिंपळ फाट्यावरही न थांबता तशाच पुढे जातात़ त्यामुळे लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची मोठी अडचण होत आहे़ या शहरांना जाण्यासाठी लातूरला अथवा अंबाजोगाईला जावे लागते़ ही गैरसोय टाळण्यासाठी पिंपळफाटा येथून धावणाऱ्या सर्व बसेस रेणापूर बस स्थानकातून जाव्यात, अशी मागणी तालुक्यातील प्रवाशांतून केली जात आहे़बसस्थानक परिसरात काटेरी झाडे- झुडपे वाढल्यामुळे नजीकचे नागरिक काटेरी झुडपाचा आसरा घेऊन प्रात:र्विधी आटोपतात़ त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे़ स्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने एस़टी़चालकाला स्थानकात येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते़ फाटकावर मोठ- मोठे खड्डे पडले असून त्याकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे़ संरक्षक तारे, भिंतीचे कामही अर्धवट राहिले आहे़ या ठिकाणी दोन वाहतूक नियंत्रक असणे गरजेचे आहे़(वार्ताहर)फरशी उखडली; पाण्याची सोय नाही... बसस्थानकामध्ये सध्या वीज, पाणी तर नाहीच़; शिवाय प्रवाशांसाठी लघुशंकागृह, शौचालय नाही़ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कॅन्टीन नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे़ बसस्थानकातील सर्व फरशी उखडली आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री अंधार असल्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात थांबता येत नाही़ परिणामी पाळीव प्राण्यांचा वावर वाढला आहे़ बसस्थानकात एकही शिपाई अथवा पहारेकरी नाही़ वाहतूक नियंत्रकाला जीव मुठीत धरून दिवस काढावा लागतो़बसस्थानकात प्रवाशांना सोयी मिळत नाहीत़ त्यासंदर्भात वरिष्ठांकडे माहिती देण्यात आली आहे़ आपण सकाळी ९ ते सायं़ ६ वा़पर्यंत काम पाहतो, अशी माहिती वाहतूक नियंत्रक पौळ यांनी दिली़