शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचारच्या ‘आयसीयू’ला गळती

By admin | Updated: September 19, 2014 01:00 IST

सितम सोनवणे , लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या छताला गळती लागली आहे़ ही गळती पावसामुळे नसून वरील वार्डातील

सितम सोनवणे , लातूरयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या छताला गळती लागली आहे़ ही गळती पावसामुळे नसून वरील वार्डातील प्रसाधन गृहातील घाण सांडपाण्यामुळे आहे़ यामुळे अतिदक्षता विभागातील गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना जंतूसंसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे़लातूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णांलयातील अतिदक्षता विभागाच्या छताला गळती लागली आहे़ ही लागलेली गळती पावसाने नाही तर ती वरच्या वॉर्डातील प्रसाधनगृहाचे व सांडपाणी छतातून पाझरुन टिपटिप गळत आहे़ ही टिपटिप एका ठिकाणी नसून तीन-चार ठिकाणी आहे़ या अतिदक्षता वॉर्डमध्ये १२ रुग्णांवर उपचार करण्यात येतो़ अतिदक्षता विभागाचा अर्थच असा आहे की, जो रुग्ण अतिगंभीर अवस्थेत आहे, त्याच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार व काळजी घेतली जाते़ या विभागात व्हेन्टीलेटर, पल्स मीटर अशी अद्ययावत इलेक्ट्रॉनिक सामग्री असते़ सर्वोपचार रुग्णालायातील महत्वाचा विभाग म्हणून या विभागाची ओळख असते़ हे जरी सत्य असले तरी सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागाकडे रुग्णालय प्रशासन गांभीर्याने बघत नसल्याचे दिसून येत आहे़ सध्या या अतिदक्षता विभागात विष प्राशन केलेले ४ रुग्ण आहेत़ त्यासोबतच अन्य रुग्णही आहेत़ या विभागाच्या छतामधून सतत पाणी टीपकत आहे़ या विभागाची फरशीही बऱ्याच ठिकाणी फुटलेली आहे़ तसेच इलेक्ट्रीकल वायरींगची अधून-मधून स्पार्किंग होत आहे़ अशा प्रकारच्या विविध समस्याने अतिदक्षता विभाग, आणि विभागातील कर्चचारी, डॉक्टर त्रस्त झाले आहेत़ तसेच शिपाई, कर्मचाऱ्यांना या टीपटीपमुळे अंतर्गत फरशी सतत पुसून घ्यावी लागत आहे़ त्याचबरोबर रुग्ण गंभीर झाल्यास त्याच्यासाठी ही धावपळ करावी लागत आहे़ डॉक्टर उपचारासाठी आले असताना त्यांच्या अंगावर हे पाणी टपकत असते़ हे पाणी पावसाचे नाही तर ते चक्क प्रसाधनगृहाचे सांडपाणी आहे़ यामुळे जे रुग्ण गंभीर आहेत़, त्यांची काळजी घेतली जात असल्याचे सांगणारे प्रशासन या टिपटिपकडे दुर्लक्ष करीत असल्याने या उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांना जंतूसंसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तरी सर्वोपचार रुग्णालय प्रशासन या गळतीकडे गांभीर्याने बघत नाही़ याबाबत रुग्णांचे नातेवाईक आश्चर्य व्यक्त करत आहे़ या बाबत इतर कर्मचारी व अधिकारी काहीच बोलत नाहीत़ सध्या अधिष्ठांताही एकच दिवस येवून जॉइन होवून महिनाभराच्या सुटीवर गेले आहेत़ सध्या प्रभारी आधिष्ठांतावरच कारभार चालत आहे़ प्रभारी अधिष्ठाता अतिदक्षता विभागाकडे अशात राऊंडसाठी फिरकतही नाही़